मीनाक्षी काटकर
दररोजच्या आहारात पोळीव्यतिरिक्त आपण अनेक प्रकारच्या पौष्टिक रोट्या, धपाटे आणि पराठे करू शकतो. कणीक, तांदळाचे पीठ, ज्वारी, बाजरी, नाचणीचे पीठ आणि काही भाज्या व फळांचा वापर करून आपण पराठे, भाकऱ्या, उत्तप्पेही करू शकतो. तेल, तूप घालून हे पदार्थ भाजता येतात. सोबत घरचं लोणी, दही, ताक, चटणी, लोणचं, ठेचा असेल तर उत्तम पौष्टिक जेवणच होतं.
वाढप
२ ते ३ व्यक्तींसाठी
साहित्य
चार वाट्या ज्वारीचे पीठ, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, ८ ते १० लसूण पाकळ्या, १ चमचा धने-जिरे पूड, मीठ, २ वाट्या चिरलेली अंबाडीची भाजी, १ वाटी चिरलेली कोथिंबीर.