वाढप
३ व्यक्तींसाठी
साहित्य
अर्धा किलो दलिया, दीड पाव मिश्र भाजी, आले, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, अर्धी वाटी खवलेला नारळ, २ ग्लास पाणी, २ चमचे बटर, २ चमचे धने-जिरे पूड, २ चमचे गरम मसाला, हिंग, तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती
दलिया स्वच्छ धुऊन घ्यावा. मिक्स भाज्या - गाजर, फ्लॉवर, मटार, श्रावण घेवडा, कोबी, कांद्याची पात, कोथिंबीर, शिमला मिरची, टोमॅटो अशा भाज्या स्वच्छ धुऊन बारीक चिराव्यात. गॅसवर एका पातेलीत दोन चमचे तेल, एक चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग, आले-मिरचीची पेस्ट, लसूण इत्यादी घालून वर लिहिलेल्या सर्व भाज्या फोडणीत घालून परताव्यात. दलिया त्याच मिक्स भाजीत घालून परतावा.
दोन ग्लास गरम पाणी घालून चवीनुसार मीठ घालावे. एक मध्यम आकाराची वाटी घेऊन त्या वाटीला आतून थोडा पाण्याचा हात लावावा. त्या वाटीत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खवलेला नारळ पसरून घालावा. त्यानंतर तयार झालेला पुलाव वाटीत भरून एका प्लेटमध्ये त्याची मूद पाडावी. स्वादिष्ट दलिया पुलाव तयार! हा दलिया पुलाव पुदिन्याच्या चटणीबरोबर वाढवा.
******