सुलभा प्रभुणे
वाढप
४-५ व्यक्तींसाठी
साहित्य
फ्लॉवरचे तुकडे, गाजराचा कीस, मटारचे दाणे, लाल भोपळ्याचे तुकडे, सिमला मिरचीचे तुकडे, कोबीचा कीस हे सगळे मिळून दोन वाट्या, दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे, पाव वाटी ज्वारी/ बाजरी/ नाचणी यापैकी कोणतेही पीठ, आले-लसूण-मिरचीची पेस्ट, लिंबाचा रस, तेल, मीठ, टोमॅटो सॉस, किसलेले चीज.
कृती
सर्व भाज्या थोड्याशा वाफवून घ्याव्यात. कोबीमुळे त्याला जर पाणी सुटले, तर ते गाळून घ्यावे. त्याचे सूप करता येते. बटाटे कुस्करून त्याचा लगदा करावा व तोही भाज्यांत घालावा. त्यात पीठ मिसळावे. आले-लसूण-मिरचीची पेस्ट घालावी. त्यात लिंबाचा रस व चवीपुरते मीठ घालावे. पॅनला किंचित तेल लावून त्यावर तयार केलेल्या मिश्रणाचा पिझ्झा लावून घ्यावा. मंद आचेवर दोन्ही बाजूने भाजावा. त्यावर टोमॅटो सॉस लावून त्यावर किसलेले चीज, गाजराचा किस, सिमला मिरचीचे तुकडे घालावेत. गरमागरम खायला द्यावे.