एक कप मँगो पल्प किंवा तीन आंब्यांचा रस, अर्धा लिटर घट्ट दूध, १ वाटी साय, ३ चमचे कस्टर्ड पावडर/ कॉर्नफ्लोअर, २ चमचे साखर.
कृती
अर्धा लिटर दूध हलवत आटवून पाऊण लिटर करावे. ३ चमचे कस्टर्ड पावडर पाण्यात मिसळून उकळत्या दुधात घालावी व ३ मिनिटे ढवळावे. वरून ३ चमचे साखर आणि १ वाटी साय फेटून घालावी. हे मिश्रण ३-४ तास फ्रिझरमध्ये ठेवून द्यावे. दुसरीकडे आंब्यांचा रस गॅसवर पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यावा. फ्रीजमधील मिश्रण काढून मिक्सरमध्ये हलकेसे फिरवून घ्यावे आणि पुन्हा डब्यात काढून त्यात आटलेला आंबा रस मिसळावा. हे मिश्रण पुन्हा ७-८ तास फ्रीझरमध्ये ठेवावे. त्यानंतर बर्फासारखे घट्ट झालेले हे मिश्रण बाहेर काढून मिक्सरमध्ये अगदी हलके फिरवून घ्यावे (पातळ होता कामा नये) आणि पुन्हा एकदा फ्रिझरमध्ये सेट करायला ठेवून द्यावे. ३-४ तासांनी अगदी स्मूथ आइस्क्रीम तयार होईल. थोडे आंब्याचे तुकडे घालून सर्व्ह करा.
साहित्य
दोन कप मैदा, ३ चमचे साखर, पाव कप कोमट दूध, २ चमचे यीस्ट (जुने वापरू नये), दीड चमचा बटर, अर्धा कप पाणी, तळण्यासाठी तेल, डार्क चॉकलेट, सजावटीसाठी पिठीसाखर, रंगीत गोळ्या.
कृती
दुधामध्ये यीस्ट घालून १० मिनिटे झाकून ठेवावे. बुडबुडे आले की त्यात मैदा घालून मळून घ्यावे. हळूहळू पाणी घालावे. खूप मळले की चिकटपणा कमी होत जातो. बटर घालून पुन्हा एकदा चांगले मळून घ्यावे. दीड ते २ तास पीठ दुप्पट फुगेपर्यंत झाकून ठेवून द्यावे. मैद्यावर जाडसर पोळी लाटून वाटीने गोल कापून घ्यावेत. औषधाच्या बाटलीच्या छोट्या झाकणाने गोलाच्या आतील अजून एक गोळा कापून काढावा. सगळे डोनट करून झाल्यावर पुन्हा १५ मिनिटे तसेच ठेवून द्यावे आणि नंतर मंद आचेवर तळून घ्यावेत. ड्रेसिंगसाठी चॉकलेट वितळवून त्यात डोनट एका बाजूला बुडवावेत. पिठीसाखर, रंगीत गोळ्या, लोणी आणि साखर कोनामधून भरून रेघोट्या, असे विविध प्रकारे सजवावे. अतिशय लुसलुशीत डोनट तयार! थोडा वेळखाऊ प्रकार असला तरी सजावट करताना मुलांना सहभागी करून घ्यावे. त्यांना नक्कीच खूप मजा येईल.
दोन वाट्या दुधी भोपळ्याचा कीस, १ चमचा तिखट, अर्धा चमचा ओवा, १ चमचा तीळ, हळद, जिरे, मीठ, तेल, प्रत्येकी अर्धी वाटी डाळीचे पीठ, तांदूळ पीठ, कणीक आणि मावेल तेवढे ज्वारीचे पीठ.
कृती
ज्वारी पीठ सोडून सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. नंतर बसेल तेवढे ज्वारी पीठ घालावे आणि पराठ्याप्रमाणे पीठ मळून घ्यावे. त्या पिठाचे लगेचच दंडाकृती लांबट गोल करावेत. तेल लावून मोदक पात्र अथवा इडली पात्रात वाफवून घ्यावे. १५ मिनिटे वाफवल्यावर गोळे थंड करून सुरीला तेल लावून त्याच्या गोल चकत्या करून घ्याव्यात. ३ चमचे तेलाची फोडणी करून जिरे, मोहरी, हिंग, बारीक चिरलेला कढीपत्ता आणि २ चमचे तीळ घालून त्यात हे काप मंद आचेवर परतून घ्यावेत. सॉसबरोबर खायला द्यावेत. वरील साहित्यात साधारण ४ जणांचा अगदी पोटभरीचा नाश्ता होतो.
दोन वाट्या गच्च भरून डेसिकेटेड कोकोनट, १ सपाट वाटी मिल्क पावडर, १ सपाट वाटी पिठीसाखर, साय/ फ्रेश क्रीम, खाण्याचे विविध रंग.
कृती
साय मिक्सरमधून हलकेच फिरवून घ्यावी. साय मऊसूत व्हायला
हवी. मग रंग आणि क्रीम सोडून सगळे साहित्य एकत्र करून घ्यावे. मिश्रणाचे जेवढे रंग असतील तेवढे भाग करावेत आणि प्रत्येक भागात वेगवेगळा रंग घालून मिश्रण एकत्र करून घ्यावे. त्याचे छोटे छोटे बॉल वळावेत. तयार बॉल डेसिकेटेड कोकोनटमध्ये पुन्हा एकदा घोळवून घ्यावेत. असे रंगीबेरंगी सुरेख लाडू समोर आल्यावर पाहूनच निम्मे पोट भरते!
साहित्य
सात-आठ इडल्या, १ वाटी डाळीचे पीठ, तिखट, मीठ, ओवा, तेल.
सारणाकरिता
दोन मोठे बटाटे उकडून कुस्करून, ५-६ मिरच्या, ७-८ कढीपत्ता पाने, अर्धा चमचा लसूण पेस्ट, कोथिंबीर, लिंबू, जिरे, मोहरी, हिंग, हळद.
कृती
मिरची, कढीपत्ता, मीठ आणि लसूण वाटून कुस्करलेल्या बटाट्याला लावून घ्यावे. मोहरी, जिरे, हिंग, हळद ह्याची फोडणी करून वरून घालावी. कोथिंबीर आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करावे. इडल्या मधे अर्ध्या कापून त्यात भाजीचा चपटा गोळा भरावा. डाळीच्या पिठात अर्धा चमचा तिखट, मीठ, चमचाभर ओवा, एक चिमूट सोडा, १ चमचा गरम तेल घालून सरबरीत पीठ भिजवून घ्यावे. भाजी भरलेल्या इडल्या त्या पिठात बुडवून तळून घ्याव्यात. मधोमध ४ फाके करून इडलीची पातळ चटणी घालून सर्व्ह करावे. अतिशय वेगळा आणि उत्कृष्ट चवीचा हा पदार्थ मुलांना हमखास आवडतोच.
साहित्य
पोळ्या, तूप, लाल तिखट, मीठ, जिरे पूड, पिठीसाखर.
कृती
शिळ्या पोळ्यांचे कात्रीने लांबट उभट काप करून घ्यावेत. तिखट कापांसाठी तूप, तिखट, मीठ, जिरे पूड भुरभुरून चोळून घ्यावे. गोड कापांसाठी तूप आणि पिठीसाखर भुरभुरून चोळून घ्यावी. आता काचेच्या प्लेटमध्ये पसरून ही प्लेट मायक्रोवेव्हमध्ये एक ते दीड मिनिट ठेवावी. बाहेर काढून एकदा वर खाली करून पुन्हा आत ठेवावी. ओलसरपणा जाऊन कुरकुरीतपणा येईपर्यंत ही क्रिया परत करावी. गार झाल्यावर हे काप संध्याकाळच्या चहाबरोबर किंवा मधला खाऊ म्हणून अगदी चवीने खाल्ले जातात.
एक वाटी रवा, अर्धी वाटी दही, १ पाकीट फ्रूटसॉल्ट, अर्धा चमचा चिरलेल्या मिरच्या, ५-६ पाकळ्या लसूण, १ कांदा, अर्धा चमचा जिरे, हिंग, हळद, मोहरी, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला.
कृती
रवा, दही, अर्धी वाटी पाणी एकत्र करून झाकून अर्धा तास ठेवून द्यावे. एकीकडे कढईमध्ये तेल घेऊन फोडणी करावी. त्यामध्ये मिरची, कांदा, लसूण घालून परतून घ्यावे. एक कप मटार, तिखट, मीठ आणि गरम मसाला घालून एक वाफ आणावी. हे मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमधून रवाळ वाटून घ्यावे. त्याचे तळहाताएवढे चपटे ४-५ गोल करावेत. रव्याच्या मिश्रणामध्ये गरजेप्रमाणे पाणी आणि अर्धे पाकीट फ्रूटसॉल्ट घालून थोडे पातळ करावे. नॉनस्टिक तव्यावर तेल घालून पॅनकेकच्या आकारात रवा मिश्रण घालावे. आता त्यावर मटारच्या पॅटी ठेवून वरून पुन्हा रव्याचे मिश्रण घालावे. साधारण एक मिनिटभर झाकून ठेवावे. पलटून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यावे. नंतर खाली उतरवून त्याचे अर्धे काप करून वरून टोमॅटो सॉसने सजवावे. बदल म्हणून बटाटा किंवा इतर मिश्र भाज्यांचेसुद्धा पॅनकेक करता येतात. डब्यात देण्यासाठी अतिशय झटपट आणि चविष्ट पदार्थ!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.