डॉ. तुषार माणिक पाटोळे रोड ट्रिपमुळे प्रत्येक स्थळाला वेळ देता आला. प्रवासात निसर्गाचे मनोहारी दृश्य निवांत पाहता आले. स्थानिक अन्नपदार्थांचा आस्वाद घेता आला. त्यामुळे ही रोड ट्रिपचा अविस्मरणीय आनंद देणारी ठरली..दरवर्षीप्रमाणे २०२३मध्येसुद्धा आम्ही राजगुरुनगर येथील वैद्यकीय व्यावसायिकांनी ट्रिपचे नियोजन केले. आम्ही नेहमी विमान, रेल्वेने सहलीला जात असू, परंतु यावेळी आम्ही रोड ट्रिप करण्याचे ठरविले. त्यासाठी आम्ही तमिळनाडूमधील स्थळे निवडली. हॉटेल बुकिंग आणि प्रवासाचा आराखडा खूप आधीच तयार केला. गाडी सर्व्हिसिंग, टायर बदलणे, सिटिंग अरेंजमेंट, कॅरियर लावणे अशी तयारी करून ठेवली. प्रवास जास्त असल्याने हॉल्ट व मुक्कामाची ठिकाणे थोड्या-थोड्या अंतरावर ठेवली. मदुराई, रामेश्वरम, तंजावर, चिदंबरम, पाँडेचेरी, महाबलीपुरम असा मार्ग ठरवला.दहा दिवसांचे कपडे आणि प्रवास साहित्य घेऊन ठरल्या दिवशी रात्री तीनला चार गाड्यांमधून आम्ही आठ कुटुंबे प्रवासाला निघालो. नाश्ता आणि दुपारचे जेवण वगळता अधेमधे फारसे न थांबता रात्री मुक्कामाला सालेम येथे पोहोचलो. अशारितीने पहिल्या दिवशी अकराशे किलोमीटर अंतर पार केले. प्रवासाचा फार काही थकवा जाणवला नाही. दुसऱ्या दिवशी २३० किलोमीटरचा प्रवास करून मदुराईला पोहोचलो. दाक्षिणात्य नाश्ता करून मीनाक्षी सुंदरेश्वरम मंदिर पाहिले. गाइड घेतल्यामुळे मीनाक्षी मंदिराची सविस्तर माहिती आम्हाला मिळाली. मंदिराला चार दिशांना चार प्रवेशद्वारे आहेत आणि त्यांवर पाच मजली गोपुरम आहेत. मुख्य मंदिरात पार्वतीचे मीनाक्षी रूपात आणि शंकराचे सुंदरेश्वर रूपात दर्शन होते. इथे दक्षिणात्य स्थापत्य कलेचा भव्य आविष्कार पाहण्यास मिळतो. संपूर्ण मंदिर ग्रॅनाईटमध्ये आहे. मंदिरात शंभर खांबांचा मंडप आहे, तिथे नाद निर्मिती होते. या मंदिराची निर्मिती सहाव्या शतकात पांड्य साम्राज्यामध्ये झाली. परिसर विस्तीर्ण असल्यामुळे हे मंदिर पाहण्यास दोन ते तीन तास लागतात. .यानंतर आम्ही नायक महाल येथे गेलो. राजपूत आणि द्रविड शैलीतील बांधकाम असलेला हा महाल १६३६मध्ये तिरूमले नायक यांनी बांधला होता, अशी माहिती मिळाली. त्यानंतर १७० किलोमीटरचा प्रवास करून रामेश्वरम येथे मुक्कामासाठी गेलो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामेश्वरम शिवलिंगाचे दर्शन घेतले. प्रथम समुद्रस्नान करून तेथील पवित्र मानल्या जाणाऱ्या २४ विहिरींचे जल अंगावर घेऊन स्नान करण्याची इथे प्रथा आहे. त्याप्रमाणे स्नान करून आम्ही अभिषेक केला. रामेश्वरम मंदिर भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. हे मंदिर विशाल दगडांनी बांधलेले आहे. त्यानंतर आम्ही रामेश्वरममधली पंचमुखी हनुमान मंदिर, गंधमादन पर्वतम, लक्ष्मण तीर्थ ही मंदिरे पाहिली. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे निवासस्थान, त्यांचे भव्य व प्रेरणादायी असणारे स्मारकदेखील पाहण्याजोगे आहे. कलाम सरांचा संपूर्ण जीवनप्रवास येथे फोटोंच्या माध्यमातून मांडलेला दिसतो.सूर्यास्तावेळी, रामायणात उल्लेख असलेल्या, रामसेतूच्या ठिकाणी अर्थात धनुषकोडी येथे गेलो. येथे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर एकत्र येतात व मनमोहक समुद्रकिनारा पाहावयास मिळतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तंजावरसाठी प्रयाण केले. साधारण २५० किलोमीटरचा प्रवास करून दुपारी बारा वाजता तंजावर येथील बृहदेश्वर मंदिर पाहायला गेलो. हे मंदिर एक हजार वर्षे जुने असून राजाराज चोला यांनी बांधल्याचे इतिहास सांगतो. या मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे. बृहदेश्वर हे शिवमंदिर आहे.त्यानंतर तेथील मराठा पॅलेस येथे भेट दिली. नायक साम्राज्यानंतर १८०० सालापर्यंत मराठा साम्राज्याने इथे राज्य केले. सरफोजी राजा द्वितीय यांनी पॅलेस आणि ग्रंथालय उभे केले.त्यानंतर १३० किलोमीटरचा प्रवास करून साधारण रात्री आठ वाजता चिदंबरम येथील नटराज मंदिरापाशी पोहोचलो. योगायोगाने आरती सुरू होती, त्यामुळे सजवलेली नटराजाची मूर्ती पाहायला मिळाली. हे मंदिरदेखील भव्यदिव्य असून दगडी बांधकाम आहे. चोला साम्राज्याच्या काळात दहाव्या शतकात बांधलेले आहे. .पाँडिचेरीला जाताजाता मॅनग्रोव्ह फॉरेस्टला भेट दिली. हे भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल असल्याचे कळले. इथल्या खाडीमध्ये छोट्या बोटीने फिरता येते. घनदाट झाडीमुळे येथे फिल्म शूटिंगदेखील होतात, अशी आणखी एक माहिती मिळाली. इथून पुढे आणखी ७० किलोमीटरचा प्रवास करून पाँडेचेरीला पोहोचलो. संध्याकाळच्या वेळात तिथली फ्रेंच कॉलनी, अरबिंदो आश्रम, फ्रेंच वॉर मेमोरियल, पॅराडाईज बीच ही स्थळे पाहिली. दुसऱ्या दिवशी ऑरोव्हिले पाहण्यासाठी गेलो. मानवी एकात्मतेसाठी वाहिलेले एक आदर्श गाव म्हणजे ऑरोव्हिले. याच्या केंद्रस्थानी मातृमंदिर आहे आणि त्याच्या भोवती ९२ बगीचे आहेत. जगातील वेगवेगळ्या भागातले लोक येथे येतात व राहतात.दुसऱ्या दिवशी साधारणपणे शंभर किलोमीटरचा प्रवास करून महाबलीपुरम येथे पोहोचलो. महाबलीपुरम हे तीन मंदिरांचा समूह असलेल्या शोअर टेम्पल (किनाऱ्यावरील मंदिरे) व इतर मंदिरांमुळे ओळखले जाते. हे शहर पल्लव राजांची राजधानी होती. येथील इतर मंदिरे दगडात कोरलेली आहेत. शोअर मंदिरांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. महाबलीपुरम येथे दगडी वस्तू करण्याचे कारखानेदेखील आहेत. मंदिरे पाहून झाल्यानंतर आम्ही इंडिया सीशेल म्युझियमला भेट दिली. येथे शंख-शिंपल्यांचे चाळीस हजारांहून अधिक नमुने पाहायला मिळतात. सगळे संग्रहालय पाहायला दीड ते दोन तास लागतात. परतीच्या प्रवासामध्ये कांचीपुरम येथे भेट देऊन तेथील प्रसिद्ध महारत्न कैलाशनाथ मंदिर पाहिले. याची निर्मिती सातव्या शतकात पल्लव राजा नरसिंह वर्मन द्वितीय यांनी केली. हे मंदिर भव्य गोपुरममुळे प्रसिद्ध आहे.अशारितीने नियोजित सर्व स्थळे पाहून पूर्ण झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. डॉ. शेखर घुमटकर, डॉ. सुहास जमदाडे, डॉ. महेश टाकळकर, डॉ. कुणाल तांबे यांचे योग्य नियोजन व सहकार्य यामुळे सहल यशस्वी झाली. सहलीचा एकूण प्रवास झाला ३,५०० किलोमीटर! रोड ट्रिपमुळे प्रत्येक स्थळाला वेळ देता आला. प्रवासात निसर्गाचे मनोहारी दृश्य निवांत पाहता आले. स्थानिक अन्नपदार्थांचा आस्वाद घेता आला. त्यामुळे ही रोड ट्रिपचा अविस्मरणीय आनंद देणारी ठरली.-------------------.Dubai Rain : दुबईचा पाऊस, १८० देशांचे नागरिक, उत्तम प्रशासन आणि मिळूनमिसळून केलेला संकटाचा सामना..! .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.