साधारणपणे एक हजार वर्षांपूर्वी एकाच वेळी सामूहिक मृत्यूची घटना घडली असावी, अशी याबाबतीत सुरुवातीची धारणा होती.
इथे मिळालेले पाच सांगाडे अंदाजे १,२०० वर्षांपूर्वीचे असावेत असा एका मानववंशशास्त्रीय सर्वेक्षणातील अंदाज होता. तथापि भारत आणि अन्य काही देशांच्य़ा शास्त्रज्ञांनी मिळून केलेले नवीन संशोधन व जनुकीय विश्लेषण वेगळेच निष्कर्ष मांडते.
अडतीस सांगाड्यांच्या अवशेषांच्या केलेल्या डीएनए अभ्यासातून एक वेगळाच खुलासा झाला आहे. एकाच वेळी सगळे मृतदेह दफन होण्याऐवजी हे अवशेष एक हजार वर्षातील अनेक घटनांमध्ये इथे दफन केले गेले असावेत, असे संकेत यातून मिळाले आहेत.