नेहा लिमये
माणूस इतिहासातून काही शिकत नाही हेच आपण इतिहासाकडून शिकतो असं म्हणतात. त्यामुळे युद्ध आणि संगीत हा सिलसिला इथेच कसा संपेल? ‘युद्धस्य कथा रम्या’सारखंच ‘युद्धस्य संगीत: रम्या’ म्हटलं तर ते वावगं ठरू नये. युद्धाच्या कथा जशा लांबून ऐकायलाच बऱ्या असतात तसंच त्याच्याशी निगडित संगीताच्या कहाण्याही!