प्रतिनिधी
शक्तीच्या अर्थात देवीच्या उपासनेची काही विशिष्ट स्थाने ‘शक्तीपिठे’ म्हणून ओळखली जातात. प्रत्येक शक्तिपीठाच्या ठिकाणी एक भैरव आणि एक शक्ती असते, अशी श्रद्धा आहे. शक्तिपीठांच्या उगमाबाबत वेगवेगळ्या आख्यायिका पुराणांमध्ये आहेत. दक्ष प्रजापतीची मुलगी सती (पार्वती) ही शंकराला दिलेली होती.