साईना नेहवाल
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत पदक मिळवणे, हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. मी वयाच्या नवव्या वर्षी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली तेव्हाच हे स्वप्न पाहिले होते. २००८मध्ये माझे हे स्वप्न हुकले. परंतु, चार वर्षांनंतर मी आणखी जिद्दीने खेळत कांस्यपदकावर नाव कोरले. खरंतर मला सोनेरी यशाचीच खात्री होती. मात्र स्पर्धेपूर्वी विषाणू ज्वरामुळे माझ्या तंदुरुस्तीवर परिणाम झाला आणि मी सोनेरी कामगिरी करू शकले नाही!