डॉ. राहुल हांडे
एक संतपुरुष व त्यांचा शिष्यपरिवार यांची ही कथा विवेकाच्या कसोटीवर उतरणारी नसली तरी भारतीय मातीतील बंधुता व सौहार्द तत्त्व अधोरेखित करणारी निश्चितच आहे. या कथेतील संतपुरुष म्हणजे राजस्थानातील मध्ययुगीन संत लालदास. अलवरजवळील धौली दूव अथवा धौलीधूप गावात इ.स. १५४०मध्ये लालदास यांचा जन्म झाला.
मध्ययुगीन कालखंडात मेवाड प्रांतातील धार्मिक पुनर्जागरण आणि सामाजिक प्रबोधन याचे श्रेय संत लालदास यांना दिले जाते.