संपादकीय सस्नेह नमस्कार, नवे रूप, अधिक विषय, नवे लेखक, अधिक पाने, नवी मांडणी यांसह नव्या रूपातला साप्ताहिक सकाळचा अंक आपल्या हातात देताना आम्हाला साभिमान आनंद होतो आहे. साप्ताहिक सकाळचा यापुढचा प्रत्येक अंक विशेषांक असणार आहे. .काळाचं अविरत फिरणारं चक्र आपल्या सगळ्यांना पुन्हापुन्हा हेराक्लिटस ऑफ इफेससच्यावळणाशी आणून उभं करत असतं. ‘चेंज इज दि ओन्ली कॉन्स्टन्ट इन लाइफ’ असं हा ग्रीक तत्त्वज्ञ काही हजार वर्षांपूर्वी म्हणाला होता. आपल्या सर्वांच्या साथीने गेल्या सदतीस वर्षांमध्ये बदलांची अशी छोटी-मोठी वळणं पार करत साप्ताहिक सकाळ आता आणखी एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे.इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी बांधल्या गेलेल्या आजच्या काळातल्या विचक्षण वाचकांकडून लोकजीवनातील नियतकालिकांच्या असण्याची चर्चा अधिकच चिकित्सकपणे होत असते. या पार्श्वभूमीवर, कालसुसंगत बदल व वाचकांशी नैमित्तिक संवाद यातून जोडले गेलेले अतूट नाते यांसह साप्ताहिक सकाळने आजच्या या बदलाच्या टप्प्यापर्यंतचा प्रवास केला आहे.साप्ताहिक सकाळ म्हणजे नवे प्रयोग, समाजातल्या विविध घटकांच्या भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या विविध घडामोडींचे विश्लेषण, साहित्य, कला, संस्कृती अशा अनेकविध क्षेत्रांतील वैचारिकतेला दिलेले प्राधान्य आणि सातत्याने वाचकांच्या बदलत्या अभिरुचीचा विचार. .सकाळ माध्यम समूहाची वाचकांशी जी बांधिलकी आहे, ज्यासाठी आपण सारे सकाळवर प्रेम करता त्याच बांधिलकीचा हा भाग आहे. आज आपल्यासाठी काही नवीन आणि काही अधिक घेऊन येताना हाच सगळा पट डोळ्यांसमोर आहे. वाचकांबरोबर विश्वासाचे दृढ नाते निर्माण करीत कुटुंबातील प्रत्येक घटकापर्यंत नवी-उपयुक्त माहिती पोहोचविणे, वाचकांच्या विचारांना चालना देणे, त्यांच्या मतांना स्थान देणे आणि याबरोबरच त्यांच्या उद्योगशीलतेला, प्रयोगशीलतेला वाव देणे हे उद्देश साप्ताहिक सकाळ सुरू करताना डोळ्यांसमोर होते.वस्तुनिष्ठता, वाचनीयता व विश्वासार्हता ही सकाळची पत्रकारितेत मानदंड निर्माण करणारी त्रिसूत्री. याच त्रिसूत्रीच्या आधाराने साप्ताहिक सकाळने नियतकालिकांच्या विश्वात स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. नवनवे विषय, त्यांची आकर्षक आणि तपशीलवार मांडणी तसंच बदलतं बाह्यजीवन, नवीन विषयांबाबत समाजात निर्माण होणारी रुची, औत्सुक्य याची जाण ठेवत, जगभरात घडणाऱ्या घटनांचा अर्थवाही मागोवा घेण्यापासून ते विज्ञान, तंत्रज्ञान, शारीरिक-मानसिक आरोग्य, फॅशन, इतिहास, साहित्य व्यवहार-चित्रपट-नाटक-कला, करिअर, पर्यटन, खाद्यसंस्कृती, अर्थकारण, पर्यावरण, विविध क्षेत्रांमध्ये होणारे नवे प्रयोग अशा विषयांशी संबंधित सदरे ह्यासाप्ताहिक सकाळच्यावैशिष्ट्यपूर्ण रचनेला आपण वाचकांनी नेहमीच दाद दिली आहे. .माहितीपूर्णविशेषांक हे साप्ताहिक सकाळचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. साप्ताहिक सकाळचे हेच वैशिष्ट्य आता अधिक ठळकपणे सामोरे येत आहे. विषयांच्या पातळीवर साप्ताहिक सकाळचा प्रत्येक अंक जेवढा वैविध्यपूर्ण, अभिरुचीसंपन्न असतो तेवढाच तो नेत्रसुखदही असावा, असाही आमचा प्रयत्न असतोच. आता त्यादृष्टीने मांडणीमध्ये होणाऱ्या नव्या प्रयोगांना आपली दाद मिळेल आणि दर आठवड्याला एका वेगळ्या विषयाची सांगोपांग चर्चा करणारे साप्ताहिक सकाळचे विशेषांक ‘कलेक्टर्सप्राइड’ ठरतील, याची खात्री आहे.साप्ताहिके- मासिकांतील लेखन अल्पजीवी असते, असा सर्वसाधारण समज असतो; परंतु साप्ताहिक सकाळमधील अनेक सदरे या समजाला अपवाद ठरली आहेत. साप्ताहिक सकाळमधील पुस्तक रूपाने प्रसिद्ध झालेल्या अनेक सदरांनी वाचकांचे ग्रंथसंग्रह समृद्ध झाले आहेत. वाचकांची वाङ्मयीन ववैचारिक रुची काही प्रमाणात समृद्ध करता आली, याचे साप्ताहिक सकाळला समाधान आहे.आज या नव्यावळणावर उभे असताना ती कृतार्थता आणि ऋणाची भावना साप्ताहिक सकाळच्या मनात आहे. आपली सगळी वैशिष्ट्येटिकवून ठेवताना, साप्ताहिक सकाळने काळाबरोबर बदलण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे.आजपासून नव्याने सुरू होणाऱ्या या प्रवासातही वाचकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना जोडणारे, त्यांना समृद्ध करणारे विषय हाताळण्याचा साप्ताहिक सकाळचा प्रयत्न असेल. माध्यमांच्या बदलत्या विश्वात मुद्रित माध्यमे काळाच्या कसोटीवर उतरत असताना आपल्या सर्वांचे आतापर्यंत लाभलेले भक्कम पाठबळ यापुढेही असेच लाभत राहील, असा विश्वास साप्ताहिक सकाळला आहेच.साप्ताहिक सकाळचे नवे रूप आपल्याला कसे वाटले ते आवर्जून कळवा अशी विनंती. आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत...!-------------------------.Share Market : अर्थव्यवस्थेची सद्यःस्थिती तेजीला जास्त पोषक त्यामुळेच अब की बार तेईस हजार.!.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.