Satara Tour : सातारा जिल्हा पावसाळी पर्यटनासाठी एकदम बेस्ट; कास पठारासह या ठिकाणी भेट देत धबधब्यात भिजण्याचा आनंद लुटा

कास पठारावर विविध प्रकारच्या ३२ प्रजातींची फुलपाखरे, १९ प्रजातींचे सरपटणारे प्राणी, ३० प्रजातींचे पक्षी व १० प्रजातींचे सस्तन प्राणी अशी जैवविविधता आढळते
satara
sataraEsakal
Updated on

अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ

सडा वाघापूर - रिव्हर्स पॉइंट अर्थातच उलटा धबधबा हे समीकरण अलीकडच्या काळात दृढ बनले आहे. येथील मजा अनुभवण्यासाठी, जलतुषार अंगावर घेण्यासाठी पर्यटक बहुसंख्येने येथे भेट देताना दिसतात. निसर्गाचे आगळे कौतुक म्हणजे सडा वाघापूर येथील रिव्हर्स पॉइंटवरून खाली उतरणारे पाणी वायुवेगाने पुन्हा वर येते. उलट्या धबधब्याचा हा आविष्कार पूर्णतः वाऱ्याच्या दाबावर अवलंबून आहे. वाऱ्याचा दाब अधिक असल्यास अतिशय मोहक व डोळ्यांचे पारणे फेडणारा असा नजारा दृष्टीस पडतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com