Summer Holiday : सुट्टी एके सुट्टी! रानमेवा लुटूया, करू वनाशी गट्टी.!

आता झोपेपर्यंत पत्ते, भुतांच्या गोष्टी करा. ‘सुट्टी एक्के सुट्टी’ आहे ना?” मुलांनी उड्या मारल्या. झोपेपर्यंत कल्ला केला..
village life
village life Esakal
Updated on

कविता मेहेंदळे

आता उन्हं वाढली. मुलांनी डोक्यांवर हॅट चढवल्या. गोपाळने सागवानाची २-३ मोठी पानं खुडली. करवंदांची काटेरी झुडपं आधिष प्रथमच बघत होता. काळी, टपोरी करवंदं तोडायला श्वेता पुढे सरसावली. “चीक् चीऽऽक्” स्वप्ना ओरडली. तिच्याकडे लक्ष न देता पटापट करवंदं खुडायची न् तोंडात टाकायची, हा खेळ सुरू झाला. करवंद आतून पांढरं असलं, तर कोंबडा आणि लाल निघालं तर कोंबडी! ना कुणाला काटा टोचला ना शोधताना त्रास पडला. गोऽऽड करवंदांची भुरळ पडली होती सगळ्यांना.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.