सायाटिकाच्या त्रासामुळे पाय का दुखतात?
सायाटिका (Sciatica) हा आपल्या शरीरातील सर्वात लांब मज्जातंतू आहे. हा मज्जातंतू कमरेपाशी सुरू होऊन पायापर्यंत जातो. सायाटिक पेन म्हणजे सायाटिक मज्जातंतूच्या मार्गावर पसरणारी वेदना. सायाटिकाची तीव्र कळ कंबरेच्या खालच्या भागात सुरू होऊन पार्श्वभाग, मांड्यांचा मागचा भाग आणि पोटऱ्या यांत पसरते. त्यामुळे साहजिकच पाय खूप दुखतात.