बटाट्याची चाळ घेऊन महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे अवतरले तेव्हा त्यांनी एक गमतीदार बडबडगीतासारखी कविताच सोबत आणली होती. ‘‘एकदा एका चाळीत गेलो, चाळ घेऊन बाहेर आलो... चाळीबाहेर दुकान माझे, तेथे विकतो हसणे ताजे, खुदकन हसूचे पैसे आठ, खोखोखोचे एकशेआठ...!!’’ अशी काहीतरी मस्त कविता होती. हसण्याचं रेटकार्डच जणू जाहीर केलं होतं पुलंनी.