संपादकीय
गेल्या दोन वर्षांपासून ही आणखी एक इशाराकथा उलगडते आहे. लांब तिकडे अंटार्क्टिकाच्या शुभ्र हिमाच्छादित पठारावर. गारठाही गारठून जावा अशा वातावरणात झपाट्याने होणाऱ्या बदलांमुळे वितळणारे शुभ्र हिम कधीतरी एके दिवशी खरोखरच जीवघेणे ठरेल अशी साधार भीती पूर्व अंटार्क्टिक पठारावरील कॉनकॉर्डिया संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांना वाटते आहे. ही कथा त्या भीतीचीच.