एजवेल फाउंडेशनने त्यांच्या देशभरात असलेल्या सदस्यांच्यामार्फत अनेक घरांतल्या ज्येष्ठ महिलांशी संवाद साधला.
त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील छोट्या, छोट्या गोष्टी जाणून घेतल्या. यापैकी अनेक महिला वय झाल्यावर अन्य लोकांवर म्हणजे त्यांच्या मुलांवर किंवा नातेवाइकांवर अवलंबून आहेत. आणि त्यामुळेच त्यांना केविलवाणं जिणं जगावं लागतंय.
स्पष्टच सांगायचं तर आपल्या आसपासच्या अनेक घरांमधल्या आज्या असंख्य तडजोडी करत, मन मारून, फक्त इतरांच्या तालावर नाचत कधी एकदा मृत्यू येईल याची वाट बघत आपल्या आयुष्याची संध्याकाळ घालवत आहेत.