श्रीक्षेत्र शिंगणापूर हे शनिदेवाचे जागृत स्थान म्हणून सर्वत्र परिचित आहे. नगर- औरंगाबाद राज्यमार्गावरील घोडेगावपासून पश्चिमेस पाच किलोमीटर अंतरावर, तर नगर-मनमाड राज्यमार्गावरील राहुरीपासून पश्चिमेस वीस किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे..शिंगणापूर येथे शनिदेवाची पाच फूट नऊ इंच उंचीची मूर्ती चौथऱ्यावर उभी आहे. त्याशेजारी मारुतीची छोटी मूर्ती आहे. चौथऱ्यासमोर उपासनी महाराजांचे मंदिर आहे. अलीकडच्या काळात शिंगणापूरला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शनिवारी येणाऱ्या अमावस्येस शिंगणापूरला मोठी यात्रा भरते. शनिजयंती, गुढीपाडवा या दिवशीही यात्रा असतात. प्रत्येक शनिवारीही दर्शनासाठी गर्दी असते. स्नान करून ओल्या वस्त्राने शनिदेवाच्या चौथऱ्यावर दर्शनासाठी जाता येते. रुईच्या पानांचा हार, गोडेतेल, कवडी, बिब्बा वाहून भाविक दर्शन घेतात. या साहित्याची परडी येथे प्रत्येक दुकानात मिळते, तसेच येथे अंघोळीसाठी व अभिषेकासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. शैक्षणिक, आरोग्यविषयक क्षेत्रांतही मोठे उपक्रम राबविण्याची विश्वस्त मंडळाची संकल्पना आहे. देवस्थानकडे स्वतःची रुग्णवाहिकाही आहे.श्री क्षेत्र शिंगणापूरचे माहात्म्य वर्णन करणाऱ्या अनेक ध्वनिफिती आहेत. आषाढी वारीच्या वेळी श्रीक्षेत्र शिंगणापूर ते पंढरपूर अशा पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन विश्वस्त मंडळातर्फे केले जाते. श्रीक्षेत्र पंढरपूर येथेही शनैश्वर देवस्थानने जागा खरेदी करून भाविकांच्या सोयीसाठी मठाची स्थापना केली आहे. तेथे भक्तनिवासाची सुविधा आहे.-----------------------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.