भूषण महाजन
पहिली तिमाही कोरडी गेली असली, तरी सप्टेंबरअखेरच्या तिमाहीकडून बाजाराच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. ते निकाल आता येतील, ते बघून बाजाराचा रोख ठरेल. कदाचित दोन-तीन महिने शेअर बाजार सुस्तावेल. खालच्या पातळीवर स्वतःला मजबूत करेल. जानेवारी २०२५पासून पुढील बजेट व पुढच्या आर्थिक वर्षाचे वेध लागतील व त्या अंदाजावर पुढील दिशा ठरेल.