जोखमीची ऐशी तैशी म्हणणाऱ्या पंटर्सची आणि अतिआत्मविश्वास दाखवणाऱ्या फंड व्यवस्थापकांची आज तरी बोलती बंद झाली आहे. सिपचा ओघ चालूच राहील व तेजी अव्याहत टिकून राहील असे वाटणाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कारणे अनेक आहेत. .१. सर्वच जागतिक बाजार मागील आठवड्यात घसरले. विशेषतः डाऊ जोन्स व नॅस्डॅक ४००हून अधिक अंश खाली आले. २. फेड व्याजदर किमान अर्धा टक्का कमी करेल अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास, तेथील बाजार अधिक खाली येऊ शकतात. ३. अमेरिकेतील बेरोजगारीचा अहवाल अत्यंत निराशाजनक आला. अर्थव्यवस्था मंदीत जाते किंवा कसे, हा प्रश्न पुन्हा भेडसावू लागला. .४. भारतीय बाजारात परदेशी संस्थांची विक्री अव्याहत चालूच आहे.५. कुठल्याही मोजमापाने भारतीय शेअर बाजार महागच आहे.६. चीनमध्ये अर्थव्यवस्थेने मनाजोगा उभार घेतला नाही.७. खनिज तेल, प्रथमच प्रतिबॅरल ७० डॉलरच्या खाली गेले आहे. ही संभाव्य जागतिक मंदीची निशाणी आहे. (मंदी येईलच असे नाही, हा लाल बावटा तात्पुरता असू शकतो.)खनिज तेल आयात करणाऱ्या भारत व चीनसाठी ही चांगली खूण असली, तरी जागतिक अर्थव्यवस्थेच्यादृष्टीने चिंताजनक आहे..आम्ही गेल्या आठवड्यात (जोखमीची ऐशी तैशी) लिहिले होते, की ‘रिटेल गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला आहे. जोखीम जोखीम काय करताय? आम्ही सर्व प्रकारची जोखीम उचलायला तयार आहोत; आता आमचे पाय ओढू नका, असे सल्लागाराला सांगत बेभानपणे बाजारात व नवीन भागविक्रीत सहभागी होणे सुरू आहे. .हा गतीवेग (मोमेंटम) निफ्टीला नक्कीच २५५०० काय, त्यापुढेही घेऊन जाईल.’ Reversion to mean हा बाजाराचा नियम आहे, तो विसरू नका इतकेच आमचे कळवळून सांगणे होते. पुढील घसरणीत निफ्टी किमान २४८२० वा २४५७० अंशावर खाली येऊन तिने पुन्हा वरची दिशा पकडली, तर तेजी टिकेल असे आमचे म्हणणे. नेमका शुक्रवार ६ सप्टेंबरचा बंद २४८५२ अंशाचा होता. पुढे २४५०० किंवा त्याखाली यायला जागा आहे. तसे होईलच असे नाही. पण मार्केट दोन्ही बाजूने अतिरेक करत असते, हे लक्षात घेतले पाहिजे..लोककवी गांगलांच्या ओळी सहजच ओठावर येतात...फुलांची वाटही इथली पुढे काट्यात जाते मजा नाही सजा आहे, जरा समजून घे तूभला बाजार दिसतो, पण खरे काहीच नाहीहिरा नाही खडा आहे, जरा निरखून घे तूही वेळ फ्युचरमध्ये खेळण्याची नाही. स्टॉप लॉस आता महत्त्वाचा!.एवढा ऊहापोह केल्यावर शेवटी आमचे म्हणणे असे, की सारे काही म्हणजे तेजी नक्कीच संपली नाही. शेअर बाजार खाली आलाच, तर २४००० ते २४३०० ह्या पातळीला धरून खरेदीच्या संधी हुडकता येतील. गेल्या महिन्यात, येन कॅरी ट्रेडच्या भानगडीत जगभराचे बाजार १० ते १४ टक्के कोसळले, पण आपले निर्देशांक जेमतेम ३ ते ५ टक्के खाली आले. .५ ऑगस्ट रोजी निफ्टीचा तळ २४०५५ होता, त्याखाली निफ्टीची १०० दिवसांची चलसरासरी २३८०८ आहे. तो स्टॉप लॉस ठेवता येईल. (अगदी डिलिव्हरीसाठीसुद्धा) ही पातळी जरी निफ्टीने गाठली, तरी जेमतेम ६ टक्के करेक्शन होते. मात्र ही चाचणी (अॅसिड टेस्ट) उत्तीर्ण झाल्यास निफ्टी २५५०० व पुढे २६०००चा डोंगर चढू शकते. त्यासाठी फेडने व्याजदर किमान अर्धा टक्का कमी करायला हवेत, किंवा किमान तसे संकेत तरी द्यायला हवेत. पुढचेही धोरण शिथिल असायला हवे. असो. कदाचित हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत शेअर बाजाराचा मूड बदललाही असेल. पण वर दर्शवलेले धोके लक्षात घेऊन धोरण आखायला हवे, इतकेच..पुढचा विषय खरेदीसाठी कुठे लक्ष द्यावे, हा आहे. औषध उद्योगाला व त्या सोबतीने चालणाऱ्या हॉस्पिटल शेअरकडे लक्ष द्यायला हवे. मागे म्हटल्याप्रमाणे एपीआय उत्पादन करणारी डीव्हीज लॅब व सिन्जीन ह्यांचा अभ्यास प्रत्येक खालच्या भावात करायला हवा. ह्या तिमाहीत जरी कामगिरी जेमतेम झाली, तरी पुढे चांगले दिवस येणार आहेत, ह्याची खात्री असू द्यावी. तसेच, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मात्यांकडे आम्ही वारंवार लक्ष वेधीत होतो. अंदाजाप्रमाणे हिंदुस्थान युनिलिव्हर, आयटीसी नवे उच्चांक करीत आहे. त्यांच्या जोडीला मॅरिको नजरेआड करून चालणार नाही. .खनिज तेल मंदीत आल्यामुळे पेंट व टायर निर्माते झळाळून उठले आहेत. एशियन पेंट्स गेली तीन वर्षे ह्या एकाच टप्प्यात फिरत होता. २१ सप्टेंबरच्या भावात आजही तो शेअर मिळतो आहे. या तीन वर्षात नफा ₹ ३३०० कोटीवरून ₹ ५५०० कोटीवर गेला आहे. अजूनही महाग वाटत असला तरी आता पी /ई ६२ आहे. विक्री केंद्रे एक लाख ६५ हजार असून, मैसूर कारखान्याची उत्पादन क्षमता ३ लाख किलोलिटरवरून सहा लाखांवर नेण्याची योजना पूर्ण जोमाने सुरू आहे. .नवे उत्पादन निओ भारत लॅटेक्स पेंट लोकप्रिय होत आहे. विराट कोहलीला ब्रॅण्ड ॲम्बॅसिडर करून केलेली ‘हर घर खेलेगा, हर घर खिलेगा’ ही जाहिरात जनमानसात रुजली आहे. ग्रामीण भागातील मागणीवर ही कंपनी राज्य करेल, असे दिसते. चांगली नाममुद्रा घेऊन तळागाळातील ग्राहकवर्ग आपलासा करण्याची ही कल्पना यशस्वी होत आहे. (ट्रेन्टने हीच क्लृप्ती वापरून ‘जूडियो’ ब्रॅण्ड लोकप्रिय केला व विक्रीत अफाट वृद्धी करून दाखवली. तो शेअरदेखील प्रत्येक किमतीला महागच वाटतो, पण घेतला नाही तर वरच जातो.) तसेच त्याच क्षेत्रातील कन्साई नेरोलॅक ३००-३१०च्या भावाला आकर्षक वाटतो. एशियन पेंट्सच्या मानाने नफाक्षमता कमी असली, तरी भावही कमी आहे. पी/ई ३७ आहे..सेमी कंडक्टर उत्पादनाची देशाची महत्त्वाकांक्षा चांगले मूळ धरीत आहे. ह्या क्षेत्राचा पुरवठा करणारे महत्त्वाचे बहुराष्ट्रीय कारखाने - अप्लाईड मटेरियल्स, केएलए, एएसएमएल, टोकियो इलेक्ट्रॉन भारताकडे नजर वळवीत आहेत. एका बातमीनुसार अप्लाईड मटेरियल्स चेन्नई येथे उत्पादन सुरू करण्याच्या विचारात आहे. ह्या क्षेत्रात टाटांनी मोठी आघाडी घेतली आहे. .टाटा इलेक्ट्रॉनिक्स ढोलेरा (गुजरात) येथे सेमी कंडक्टर फॅब्रिकेशन केंद्र सुरू करीत आहे. तंत्रज्ञान तैवानस्थित पॉवर सेमी कंडक्टर कंपनी देणार आहे. सीजी पॉवरनेही जपान येथील रेनेसास इलेक्ट्रॉनिक्स व थायलंडस्थित स्टार्स मायक्रो इलेक्ट्रॉनिक्ससोबत करार करून भांडवलाची जुळणी केली आहे. त्याखेरीज किन्सचे उत्पादन केंद्र हाच बेत करीत आहे. तैवान, सिंगापूर व चीन सेमी कंडक्टर तंत्रज्ञानाच्या जोरावर मोठे झाले, तेथे सुबत्ता आली. आज ते देश जगाचे पुरवठादार आहेत. हे क्षेत्र पुढेही विस्तारतच जाणार आहे. .अप्लाईड मटेरियल्सचे उत्पादनातील अग्रस्थान नेदरलँडने हिरावून घेतले आहे. कारण अमेरिकेचे परराष्ट्र धोरण! ते चीनबरोबरच्या व्यापाराबाबत उदासीन आहे. ह्या कंपनीला तामिळनाडू सरकारने ५० टक्के अनुदान जाहीर केले आहे. त्यासोबत ५००च्या वर रोजगारनिर्मिती केल्यास ५० टक्के कर्मचारी खर्च उचलायची तयारी दर्शवली आहे. पुढील दोन तीन वर्षे ह्या क्षेत्रात बऱ्याच घडामोडी होणार, ह्याची ही नांदीच समजली पाहिजे. प्रत्येक घसरणीला संधी मानून क्षेत्रबदल करत आपला पोर्टफोलिओ ताजातवाना ठेवणे गुंतवणूकदाराला जमले, तर अजून काय हवे?.(भूषण महाजन शेअर बाजाराचे विश्लेषक आहेत.) .महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही, हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे, हेही ध्यानात घ्यावे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.