डॉ. वर्षा तोडमल
ओल्या जमिनीत टाकलेले बी जसे चटकन रुजते आणि फोफावते, तसे कुमारांच्या संवेदनशील मनोभूमीत संस्कारांचे चांगले बीजारोपण करणारी मुखपृष्ठे मनशक्ती बालकुमार मासिकाला शिदंनी दिली.
सरांच्या (शि.द. फडणीस) आणि माझ्या स्नेहाला एक दशक झालं. काही माणसांचा आपल्यावर अपेक्षेपेक्षा जास्त लोभ असतो. ते आपल्या जीवनाला उमेद देतात, आनंद देतात, ऊर्जा देतात. अशी माणसं आपल्याला भेटतात, ही परमेश्वराची कृपा नाही का?
आपल्या हातून जी सत्कृत्यं घडतात, त्यांची प्रेरणा त्या व्यक्तीच असतात. हे भाग्यच. विनयशील, आतिथ्यशील पारदर्शी निरागस व्यक्तिमत्त्व म्हणजे शिदं...!