श्री शंभू महादेवशिखर शिंगणापूरचा शंभू महादेव म्हणजे महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत. सातारा, सोलापूर आणि पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर शंभू महादेवाच्या डोंगररांगांतील शिखरावरील हे मंदिर प्राचीन काळापासून सर्व प्रसिद्ध आहे..देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजा येथे येऊन राहिला होता. त्याने पन्हाळा येथील युद्धात राष्ट्रकूट भोज याचा पराभव करून येताना भूषणगड किल्ला बांधला व शिंगणापूर गाव वसवले. सिंघण राजाने तेरा घुमटी मंदिर बांधून प्राचीन मंदिराचा पहिला जीर्णोद्धार केला. त्यानेच सुमारे पन्नास एकरांचे शिव-पार्वती तळे, अमृतेश्वर मंदिर, सहा कोसांवर एक पुष्करणी व शिवमंदिर बांधले. शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत. मालोजीराजे आपल्या परिवारासह येथे देवदर्शनासाठी येत. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी एक मोठे तळे येथे बांधले. त्यास पुष्करतीर्थ असे म्हणतात. पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे १७३५मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले. १९७८मध्ये त्याचा जीर्णोद्धार झाला. दक्षिणेतील रामस्वामी या स्थापत्य तज्ज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून आकर्षक रंग देण्यात आला आहे.चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षात शिंगणापूर येथे मोठी यात्रा भरते. राज्याच्या सर्व भागांतून, तसेच आंध्र प्रदेश व कर्नाटकातून लाखो भाविक या काळात येथे येतात. चैत्र शुद्ध अष्टमीस शिव-पार्वतीचा विवाह सोहळा होतो. या सोहळ्याच्या वेळी शंभू महादेवाच्या मंदिराच्या कळसास सुती पागोटे बांधण्यात येते. मुंगी घाटाच्या कड्यावरून पाण्याच्या मोठमोठ्या कावडी चढविण्याचा कार्यक्रम द्वादशीला होतो.--------------------------