ऋचा थत्तेमाझ्या आजीने तिच्या ट्रंकेतला चांदीच्या जरीचा शालू मला दाखवल्याचं आजही आठवतंय. त्या जरीचा बाहेर आलेला एक धागा, त्याचा स्पर्श आणि त्याची चमक आजही डोळ्यासमोर लख्ख आहे. इतकंच काय, त्या शालूचा गंधही स्मरणात आहे..चांदीच्या ताटामंदी फूल दाशाळाचं लालत्याच रंगाची चोळी धाड भाऊरायादोन ओळींची ही ओवी, पण याच शब्दांनी कवयित्री इंदिरा संत यांचं लक्ष वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी वेधून घेतलं. आणि मग परकराच्या ओच्यात शंखशिंपले गोळा करत जावेत तसा अक्षरओळख नसलेल्या स्त्रियांच्या जात्यावरील ओव्या गोळा करण्याचा छंदच त्यांना जडला. पुढे ‘मालनगाथा’ नावाने त्यांनी दोन खंड संपादित केले, जो अनमोल ठेवाच म्हणायला हवा.इतकं काय होतं या एका ओवीत? तर ओवी म्हणजे केवळ दोन ओळी नसून प्रतिभेचा अद्भुत अविष्कार असल्याचं सर्वप्रथम इंदिराबाईंना जाणवलं ते याच ओवीमुळे. मॅट्रिकच्या सुट्टीत त्यांच्या तवंदी या गावात झोपाळ्यावर बसून एक सखी त्यांना ही ओवी ऐकवत होती. या दोन ओळींत इंदिराबाईंना एक शब्दचित्र दिसलं आणि त्यांनी ते अनुभवायचं ठरवलं.दाशाळाचं, म्हणजे जास्वंदीचं लाल रंगाचं फूल त्यांनी लगेच खुडलं आणि देवघरातील चांदीच्या तबकात ठेवून पाहिलं. मग त्यांना खऱ्या अर्थानं ओवीतलं सौंदर्य जाणवलं. कारण म्हणजे ते चांदीचं तबक आणि त्यात खुलून दिसणारा जास्वंदाचा लाल रंग! ‘त्याच रंगाची’ या शब्दांतल्या ‘च’मधून स्त्रीसुलभ आग्रही मन दिसतं. लाल रंगाची छटा अशी म्हणजे अशीच हवी, जराही फिकट किंवा गडद नको!बरं या रंगाला चांदीचीच बॅकग्राऊंड का असेल? कितीतरी धातू आहेत! तर याचं कारण म्हणजे तिची कांती चांदीसारखी लख्ख असणार आणि अशा कांतीवर जास्वंदीचा लाल रंग नेहमीच खुलून दिसतो. म्हणून चांदीच्या ताटाचं उदाहरण. श्रावण महिन्यात तर ही ओवी नेहमीच मनाला स्पर्शून जाते. ‘मृद्गंध’ या ललित लेखसंग्रहात ही ओवी आणि तिची आठवण इंदिराबाईंनी रेखाटली आहे.याच साऱ्याचा विचार करत असताना जाणवलं, चांदीसारखी लख्ख कांती आवडू शकते, पण मानवी मनाची काय गंमत आहे पाहा! केसात चांदी असेल, तर ती मात्र झाकली जाते. असो! पण तसंही खऱ्याखुऱ्या चांदीच्या दागिन्यांचा विचार केला तर लक्षात येतं, की कमरेपासून पायाच्या बोटापर्यंतचे दागिने हे शक्यतो चांदीमध्ये घडवलेले असतात.त्यात बाळाच्या कमरेची साखळी, स्त्रियांचा कंबरपट्टा, छल्ला, मेखला, पायातील पैंजण, विवाहित स्त्रीच्या बोटातील जोडवी आणि मासोळ्या अशा दागिन्यांचा समावेश असतो. या दागिन्यांमुळे सौंदर्य तर वाढतंच, पण शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करणं आणि हार्मोनल बॅलन्स राखणं यासाठीही चांदी गुणकारी आहे, म्हणतात.अर्थात अलिकडे फॅशनचा विचार करता या सगळ्यात काळानुरूप अनेक बदल झालेले दिसतात. तरीही खऱ्या दागिन्यांचं आकर्षण आजही कायम आहे. मात्र कधी आर्थिक स्थितीनुसार, तर अनेकदा सुरक्षेसाठी सोन्यापेक्षा चांदीवर भर दिला जातो. ‘खरं’ घातल्याचं समाधान मिळतं आणि आरोग्यालाही लाभ होतो..अक्षरओळख ही नसलेल्या स्त्रियांच्या जात्यावरच्या ओव्यांमध्ये चांदीचा उल्लेख कसा येतो याची दोन उदाहरणं पाहा -हौस मला मोठी मासूळ्याशी जोडव्याचीचांदी आणावी बडूद्याचीचांदीची जोडवी घडण शिंदेशाहीहळूच पाय टाक खाली मुरुमाची भूईअर्थात चांदीचे दागिने किंवा चांदीच्या वस्तू जपण्यामागे भावना आणि आठवणीही असतात. एक-दोन आठवणी सांगायच्या, तर माझ्या आजीने तिच्या ट्रंकेतला चांदीच्या जरीचा शालू मला काढून दाखवल्याचं आजही आठवतंय. त्या जरीचा बाहेर आलेला एक धागा, त्याचा स्पर्श आणि त्याची चमक आजही डोळ्यासमोर लख्ख आहे.इतकंच काय, त्या शालूचा गंधही स्मरणात आहे. असंच एकदा गावी गेले असताना माझ्या चुलत सासूबाईंनी चांदीची हळदीकुंकवाची कोयरी दिली. ही कोयरी कोणती? तर माझ्या आजेसासूबाईंची! सर्वात धाकट्या सुनेकडे ती राहावी ही कोयरी देण्यामागची भावना. त्या कोयरीवरून आठवलं, खास हळदीकुंकवाला वापरली जाणारी अत्तरदाणी व गुलाबदाणी हीसुद्धा चांदीचीच.जवळच्या व्यक्तींकडे असलेल्या एखाद्या कार्यात जर चांदीची भेटवस्तू दिली, तर ती जपली जाते आणि आठवणीतही राहते. चांदीची राखी बांधली किंवा केसात माळायचं चांदीचं फूल भेट म्हणून दिलं, तर ती आठवण कायमस्वरुपी मनाच्या तिजोरीतही लखलखत राहते.पूजेच्या साहित्यामध्ये निरंजन, उदबत्तीचं घर, नैवेद्याची वाटी या वस्तू आवर्जून चांदीत केल्या जातात. असंच एकदा एका नातलगांकडे काही सणानिमित्त जेवायला जाणं झालं असता त्या काकूंनी त्यांच्या मुलीला नैवेद्यासाठी चांदीचं ताट आणायला सांगितलं.तर हिला आला होता कंटाळा. म्हणून ती म्हणाली, ‘आई गं... साध्या ताटात वाढलं, तर देव काय रुसेल का?’ त्यावर तिच्या आजीनं सांगितलं, ‘अगं राणी देवाची कसलीच अपेक्षा नसते. पण तो आपल्याला इतकं सगळं देतो, तर सुखाच्या क्षणी तरी त्याची आठवण ठेवावी आणि आपल्याकडून त्याला शक्य तितकं चांगलं द्यावं, ‘भारी’ द्यावं.’यातली आजींची ‘देवाला भारी द्यावं’ यामागची कृतज्ञतेची भावना मनाला नक्कीच स्पर्शून गेली. म्हणूनच अनेकजण देवाच्या मूर्ती, त्यांचे मुकुट, दागिने आवर्जून चांदीतच घडवतात.मला आठवतंय, एका ज्वेलरकडे कृष्णासाठी चांदीची बासरी करण्यासाठी बराच वेळ चर्चा चालू होती. ती बासरी आजीच्या पंच्याहत्तरीनिमित्त तिच्या कृष्णमूर्तीसाठी करायची होती. खरंच, कुठल्याही निमित्तानं असं कुठे श्रद्धेने नतमस्तक होता आलं, तर अहंकाराचा वारा सहसा शिवत नाही.अहंकार किंवा गर्व याचं मुख्य कारण अनेकदा पैसा असू शकतं. पण इथेही गंमत अशी, की श्रीमंताघरी जन्माला आला, म्हणजे तोंडात चांदीचा चमचा घेऊन आला! आणि यावरूनच एक मजेशीर वाक्य वाचनात आलं ते सांगते - ‘पूर्वी म्हणे घरोघरी चांदीचे चमचे असायचे आणि आता चमच्यांची चांदी होते.’मराठी भाषेत असे शब्दांचे खेळ करावे तितके कमीच! यावरूनच असं वाटलं, चांदी आणि चांदणी या शब्दांमध्ये साम्य आहे ते त्यांच्या बाह्यरंगाचं. पाहा ना, चंद्र, चांदणी, चांदणं आणि चांदी!.यावरून शांताबाईंच्या कोळीगीतातली ओळही आठवली पाहा -रात पुनवेचं चांदणं प्याली, जणू चांदीची मासोळी झालीआता जशी दृष्टी तशी सृष्टी या न्यायानं चांदण्यांनी सजलेलं रात्रीचं आकाश या दृश्यात कोळी बांधवाला त्याच्या नजरेतून मासोळी दिसणार, हे शांताबाईंनी नेमकेपणानं ओळखून शब्दयोजना करणं खरंच स्पर्शून जातं. अशीच ‘रुपेरी वाळूत...’ किंवा ‘शारद सुंदर चंदेरी राती’ ही आपली आवडीची गाणी.चांदीची आणि चांदण्याची शीतलता एकाच वेळी आपल्या मनाला स्पर्शून जाते. एकंदर सिनेसृष्टीचा चमचमाट पाहूनच आपण तिला चंदेरी दुनिया म्हणून संबोधतो.चांदीच्या चमचमण्याबद्दल आपण बोलतोय, पण प्रत्यक्षात आपण अनुभवतो, ते चांदीचं लवकर काळं पडणं. आणि म्हणूनच चांदीची भांडी लखलखीत ठेवणं ही जरा कसरतच असते. यावरून कुठेतरी एकलेला एक किस्सा आठवला.एका गावातील एका घरात म्हणे पिढ्यानपिढ्या एकच तांब्या आंघोळीसाठी वापरला जात होता. त्या घरी नव्या सुनेचं आगमन झालं आणि तिने उत्साहाने हा काळाकुट्ट तांब्या घासायला घेतला. तो चांदीचा निघाला तशी त्या कुटुंबाची खरेच चांदी झाली.जसा चांदीच्या दागिन्यांचा शरीराला लाभ होतो, तसंच जेवायला चांदीची भांडी वापरली, तर त्याचाही फायदा होतो. पाणीही आवर्जून चांदीच्या भांड्यातून पितात. पूर्वीच्या काळी राजवाड्यात एखादा मंगलप्रसंग असेल, तर बाहेरगावाहून आलेल्या पाहुण्यांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी राज्यातील सर्व जलाशयात चांदीची नाणी टाकली जात.आपल्यालाही रोज चांदीची भांडी वापरणं शक्य नसेल, तरी पाण्याच्या पिंपातच चांदीची वस्तू बुडवून ठेवली तरी फायदा होईल. आता ही गुणकारी चांदी साठावी, म्हणूनच कदाचित काही ठिकाणी अमावस्येला चांदी खरेदी करण्याची पद्धत आहे.चांदीच्या वापराबाबत वाचनात आलेली गोष्ट अशी - अलेक्झांडर युद्धमोहिमेवर असताना त्याचे सैनिक आजारी पडू लागले, तर सरदार मात्र निरोगी होते. पण सैनिक आजारी असल्यामुळे त्याला अक्षरशः माघारी परतावे लागले. पण अनारोग्याचे कारण मात्र कळले नाही.नंतर जवळपास दोन हजार वर्षांनी शास्त्रज्ञांना लक्षात आले, की अलेक्झांडरच्या सैनिक व सरदारांना त्यांच्या पदानुसार अन्नपाण्यासाठी वेगवेगळ्या धातूंची भांडी दिली होती. सैनिकांसाठी लोखंडं, तर सरदारांसाठी चांदी! साहजिकच, चांदीच्या निर्जंतुकीकरणाच्या गुणधर्मांमुळे सरदारांचे आरोग्य उत्तम राहिले होते.असा या धातूचा महिमा. या गोष्टीचा विचार करताना सहजच मनात आलं, की आपल्या मनात सद्विचारांची चांदी पेरली तर? आपलं बोलणं आणि वागणंही शुद्ध होईल आणि अशा शुद्ध आचरणाने आयुष्याची चांदीच नव्हे, तर सोनंही होईल! पटतंय ना?(ऋचा थत्ते निवेदिका व व्याख्यात्या आहेत.)--------------------------