स्वप्ना सानेपावसाळ्यातील आर्द्रतेमुळे घाम सतत येत असल्याने आपल्या सर्वांगाची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. ह्या दिवसांत घामाचा वासदेखील येतो. ह्यासाठीच डीओडरन्टयुक्त बॉडी वॉश, कोलोन, परफ्युम किंवा बॉडी मिस्ट असे प्रॉडक्टचे लेअरिंग करावे..मान्सूनचे आगमन होताच हवेत जरा गारवा जाणवतो. पण उन्हापासून पूर्णपणे सुटकाही झालेली नसते. हवेतली आर्द्रताही वाढलेली असते. त्यामुळे पावसाने जरी वातावरण गार झाले, तरी ह्युमिडिटीमुळे त्वचेवर चिप-चिप फीलिंग जाणवतेच. मुंबई, गोव्यासारख्या ठिकाणी तर जास्तच घाम येतो आणि त्वचा कायम ओलसर जाणवते. अशा वेळी त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स...आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार स्किन केअर प्रॉडक्ट निवडावे. ड्राय, नॉर्मल, ऑईली अथवा कॉम्बिनेशन त्वचा असे त्वचेचे प्रकार असतात. त्याप्रमाणे फेस वॉश, क्लीन्सिंग मिल्क, मॉइस्चरायझर, बॉडी लोशन, फेस पॅक, नाईट क्रीम अशा बेसिक स्किन केअर रुटीनसाठी लागणारे प्रॉडक्ट घ्यावेत.ऋतू बदलतो त्या वेळेस त्वचेमध्येदेखील बदल जाणवतात. म्हणून त्या-त्या वेळेनुसार स्किन कंडिशन बघून प्रॉडक्ट घ्यावे.सीटीएम - क्लीन्सिंग, टोनिंग, मॉइस्चरायझिंग रुटीन फॉलो करावे. रोज रात्री झोपायच्या आधी क्लीन्सिंग मिल्कने त्वचा क्लीन करून गुलाब जल किंवा अजून कुठले टोनर असेल तर त्याने त्वचा टोन करावी. हल्ली ॲलो व्हेरा, क्युकम्बर, बेसिल असे वेगवेगळे स्किन टोनर उपलब्ध आहेत. त्यापैकी चांगल्या ब्रँडचे बघून वापरावे. त्वचेच्या प्रकारानुसार मॉइस्चरायझर लावावे.आठवड्यातून एकदा त्वचा एक्सफोलिएट करावी, म्हणजे मृत त्वचा निघून जाते, थोडे टॅनही कमी होते. नंतर एखादा टी ट्री ऑइलयुक्त फेस पॅक लावावा. टी ट्री ऑइल हे अँटी-फंगल आहे. त्यात मेडिसिनल प्रॉपर्टी असल्यामुळे, त्वचेवर काही पुरळ, एकने असल्यास ते हिल करायला मदत होते. .आर्द्रतेमुळे सतत घाम येत असतो. त्यामुळे त्वचा सारखी पुसली जाते. पण ऊनही तेवढेच असल्यामुळे त्वचा टॅनही होते. त्यामुळे बाहेर जायच्या आधी बर्फाचा एक खडा चेहऱ्यावर फिरवायचा, त्यामुळे स्किन पोअर टाइट होतात आणि त्वचा बराच वेळ टवटवीत राहते.गुलाब पाण्यामध्ये गुलाब पाकळ्या मिक्स करून ते बर्फाच्या ट्रेमध्ये सेट करावे. हे क्युबही टोनरसारखे वापरता येतात. नैसर्गिक ॲलो व्हेरा जेल काढून मिक्सरमध्ये ब्लेंड करून त्याचा ज्यूस करून ठेवावा. हे फ्रीझरमध्ये सेट करून त्या बर्फाने चेहरा टोन आणि हायड्रेट दोन्ही करता येतो. क्युब जास्तीत जास्त एक मिनिट त्वचेवर फिरवावा, त्यापेक्षा अधिक वेळ केल्यास त्वचा लाल होऊ शकते.पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे घाम सतत येत असल्याने आपल्या सर्वांगाची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे अंडर आर्म्स क्लीन ठेवावेत आणि आठवड्यातून एकदा स्क्रब करावे. रोज आंघोळ झाल्यावर डीओडरन्ट पावडर लावून त्वचा ड्राय ठेवावी.हेवी बस्ट अथवा हेवी थाईज, मान, अंडर आर्म्स अशा ठिकाणी स्किन फोल्ड्स असतील तर त्या ठिकाणची त्वचा नीट कोरडी करून अँटी बॅक्टेरिअल बॉडी पावडर लावावी. ह्यामुळे घाम कमी येईल आणि त्वचा कोरडी असली की इन्फेक्शन होणार नाही. .ह्या दिवसांत घामाचा वासदेखील येतो. बरेच वेळा घाम, पोल्युशन आणि त्वचेमधील नैसर्गिक तेल ह्याचा एकत्रित असा कुबट वास येतो; त्वचेलाही आणि केसांनाही. ह्यासाठीच डीओडरन्टयुक्त बॉडी वॉश, कोलोन, परफ्युम किंवा बॉडी मिस्ट असे प्रॉडक्टचे लेअरिंग करावे.शक्य असल्यास एकाच सुगंधाचे प्रॉडक्ट घ्यावेत. म्हणजे जर तुम्ही सिट्रस वासाचे प्रॉडक्ट घेणार असाल, तर बॉडी वॉशपासून परफ्युमपर्यंत सगळेच प्रॉडक्ट रिफ्रेशिंग लाईम फ्लेवरचे घ्यावेत, अथवा त्याचे ब्लेंड असलेले घ्यावेत, म्हणजे सुवास दीर्घकाळ टिकतो.पावसाळ्यात मस्क, लेमन, वूडी, ऑरेंज हे सुगंध जास्त फ्रेश वाटतात. ह्याच्या कॉम्बिनेशनमध्ये असलेले डीओ, परफ्युम, बॉडी लोशन, बॉडी मिस्ट निवडावेत.त्वचेवर लोशन लावून झाले, की पुढचा अंडर आर्म्सवर डीओ लावायचा. नंतर समोर, पाठीमागे, गुडघ्यांच्या मागे बॉडी मिस्ट स्प्रे करायचे. नंतर पल्स पॉइंटना म्हणजे कानामागे, गळ्याच्या मध्यभागी, मनगटावर आणि गुढघ्याच्या मागे परफ्युम लावायचे.कपड्यांवर एक फायनल स्प्रे मारावा. कारण त्वचेपेक्षा जास्त वेळ कपड्यांवर वास टिकतो. एक लक्षात असू द्यावे, हे सगळे एकाच बेस नोटचे प्रॉडक्ट असावेत, म्हणजे वास छान येतो आणि दीर्घकाळ टिकतो. वेगवेगळ्या वासांच्या प्रॉडक्टचे लेअरिंग करू नये.त्वचेसोबतच केससुद्धा सुगंधित करायला विसरू नये. त्यासाठी तुम्ही तुमच्या रेग्युलर शाम्पूमध्ये टी ट्री ऑइल किंवा लव्हेन्डर इसेन्शियल ऑइलचे काही थेंब घालू शकता.घरच्या घरी हेअर स्प्रे करता येईल. त्यासाठी स्प्रे बॉटलमध्ये पाणी भरून, त्यात सुगंधित तेलाचे काही थेंब घालावेत आणि मिक्स करून स्काल्प आणि केसांवर स्प्रे करावे. अल्कोहोल बेस्ड परफ्युम स्प्रे करू नये, त्यामुळे केस डॅमेज होतील.(स्वप्ना साने कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि ब्यूटी थेरपिस्ट अाहेत.)----------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.