स्वप्ना सानेशरीरामध्ये होणारे हार्मोनल बदल असोत, किंवा वातावरणामध्ये होणारे नैसर्गिक बदल असोत; या दोन्ही बदलांमुळे त्वचा, केस, ओठ यांबाबत काही समस्या जाणवतात. नेमके कारण सापडले, की त्यावर सहज सोपे उपाय शोधायला वेळ लागणार नाही. .माझे वय ४८ वर्षे आहे. सध्या हार्मोनल बदल होत असल्याने माझी त्वचा खूप खराब झाली आहे. चेहऱ्यावर पिगमेंटेशन आले आहे. त्याचबरोबर त्वचा खूप रफ आणि निस्तेज दिसतेय. तुम्ही नेहमी सांगता त्याप्रमाणे मी सीटीएम फॉलो करते. पण तरी चेहरा फ्रेश दिसत नाही. काय करावे?: चाळिशीनंतर शरीरात हार्मोनल बदल घडतात. त्यामुळे अनेकवेळा त्वचेमध्येही बदल होतात, उदाहरणार्थ, वांग येणे म्हणजेच पिगमेंटेशन, कोरडेपणा, टेक्स्चर रफ जाणवणे, त्वचा डीहायड्रेट होणे, कधी पिंपल येणे, वजन वाढणे, मानेवर काळपट पट्टा येणे आणि असे बरेच छोटे मोठे बदल आपल्या प्रकृतीनुसार घडत असतात. तुम्ही सीटीएम फॉलो करताय, ते जरूर नियमितपणे करत राहा. त्याव्यतिरिक्त तुमच्या ब्यूटी थेरपिस्टकडून अँटी-पिगमेंटेशन फेशियल करून घ्या. ब्यूटी थेरपिस्ट तज्ज्ञ आहे ना, याची खात्री करा. नंतर ते सांगतील त्याप्रमाणे तुम्हाला काही सेटिंग कराव्या लागतील. हायड्रेटिंग फेशियल केल्याने त्वचेला ग्लो येईल हे नक्की. शिवाय तुम्ही घरच्या घरी झटपट हायड्रेटिंग पॅक लावू शकता. १ चमचा मध, त्यात थोडे दही आणि अर्धा चमचा दूध पावडर मिक्स करून हा पॅक चेहऱ्याला १५ मिनिटे लावून ठेवावा. नंतर गार पाण्याने चेहरा धुऊन घ्यावा. टोनर स्प्रे करून नंतर त्वचा मॉइस्चरायझर लावून हायड्रेट करावी. हा पॅक तुम्ही आठवड्यातून तीन वेळेस किंवा एक दिवसाआड लावू शकता. शिवाय हात, गळा आणि मानेलाही हा पॅक लावता येईल. बाहेर जाताना सनस्क्रीन जरूर लावावे.शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असेल, तरीही त्वचेमध्ये ह्यापैकी काहीना काही बदल जाणवतात. त्यामुळे एकदा डॉक्टरांच्या सल्ल्याने जनरल टेस्ट करून त्याप्रमाणे व्हिटॅमिन आणि कॅल्शियमचे सप्लिमेंट घेता येतील. पौष्टिक आहार घेणे आणि स्वतःची काळजी घेणे खूप आवश्यक असते, त्याप्रमाणे आपले रूटीन सेट करावे. हे उपाय करून बघा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. .माझी त्वचा ड्राय आहे. माझ्या डोक्याला खूप घाम येतो आणि लगेच तिथली स्किन आणि केस ऑइली जाणवतात. केस धुतले जातात, त्या दिवशी एकदम फ्रेश असते, पण दुसऱ्या दिवसापासून केस चिकट जाणवतात. आणि घाम व ऑईल असे एकत्र होऊन चिपचिप वाटते. तिसऱ्या दिवसापासून, बरेच दिवस केस न धुतल्याने येतो तसा वास केसांना यायला लागतो येतो. माझे फील्ड वर्क असते, त्यामुळे मी सतत बाहेर ऊन आणि प्रदूषणाला एक्सपोज्ड असते. कुठे वेगळ्या ठिकाणी कोणासोबत बाहेर जायचे असल्यास मला आधी केस धुवावे लागतात. ऐनवेळी काही मीटिंग ठरल्या तर खूपच पंचाईत होते, कारण केसांना एकप्रकारची दुर्गंधी येते. अशा वेळी खूप एम्बॅरसिंग सिच्युएशन निर्माण होते. केस दाट असल्यामुळे रोज हेअर वॉश शक्य नाही. काही उपाय असेल तर सुचवावा.: तेलग्रंथी जास्त सक्रिय असल्यावर असे होऊ शकते. त्यात तुमचे केस दाट आहेत म्हटल्यावर केसांच्या मुळाशी वारे लागणे जरा अवघड असते. दमट वातावरण किंवा उष्णता वाढली की घाम आणि तेलग्रंथी अधिक सक्रिय होतात. केसांच्या मुळांना पुरेशी हवा लागली नाही, तर सतत येणारा घाम तिथल्या तिथे साचून राहिल्याने जीवाणूंची संख्या वाढते आणि त्यामुळे एक विशिष्ट प्रकारचा वास यायला लागतो. त्यामुळे एक प्रकारचा वास यायला लागतो आहे आणि साहजिकच कोणी जवळ आल्यास एम्बॅरसिंग परिस्थिती निर्माण होत असेल.ह्यावर एक उपाय करता येईल, तुम्ही आवळा आणि शिकेकाईयुक्त हर्बल शाम्पू वापरायला सुरुवात करा. हे क्लिअर शाम्पू असतात, त्यामुळे इतर शाम्पूंच्या तुलनेत जरा माइल्ड असतात. हेअर वॉश करायच्या आधी ऑईल मसाज केला नाही तरी चालेल. पण सात ते दहा मिनिटे लाकडी कंगव्याने केस विंचरावेत. असे केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते. शिवाय त्वचेवर जे अतिरिक्त तेल असते, ते केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत पोहोचते. ह्यामुळे केसांना चमक येते आणि स्प्लिट एंड तयार होत नाहीत. शाम्पू रोज करू नका, पण काही दिवस एक दिवसाआड जरूर करा. आणि महत्त्वाचे म्हणजे शाम्पू खूप लावायचा नाही, थोडा घेऊन थोड्या पाण्यात मिक्स करून त्या पाण्याने डोके स्वच्छ करावे. केस नैसर्गिकरित्या वाळू द्यावेत. आवश्यक असेल तरच ड्रायरचा वापर करावा.बाहेर जाताना आपल्या पर्समध्ये सुगंधित हेअर स्प्रे ठेवावा. हा स्प्रे अगदी घरच्या घरी करता येईल. छोट्या स्प्रे बाटलीमध्ये पाणी घेऊन त्यात इसेन्शिअल ऑईलचे काही थेंब टाकावेत. उदाहरणार्थ, लेमन ग्रास किंवा ऑरेंज; या सुगंधांमुळे एकदम फ्रेश वाटते. फ्लोरल सुगंध आवडत असल्यास जास्मीन, रोझ किंवा लोटसही खूप छान आहेत. ह्या स्प्रे तुम्ही शाम्पू केल्यावर केस ऐंशी टक्के वाळले की वापरू शकता. शिवाय ऑफिसमध्येही गरज असेल तेव्हा केसांच्या आत कानाच्या मागे आणि मानेवरच्या केसांवर स्प्रे करावा. तुम्हाला स्वतःलाही फ्रेश वाटेल आणि केसही सुगंधित राहतील.शक्य असल्यास हेअर कट असा करावा, जेणेकरून केसांना आतपर्यंत वारे लागेल. दाट केसांमुळे वारे मुळांपर्यंत पोहोचत नाहीत, म्हणून हेअर कट त्याप्रमाणे करावा. .रोजच्या गोष्टी शेअर करायला कोणीतरी हवंय पण Dating App चा पर्याय नकोच! 'Generation Z' Dating App पासून लांब जातेय का? .हवामानात सारखा बदल होतो त्यामुळे असेल कदाचित, पण हल्ली ओठ खूप फुटताहेत आणि पायांनाही भेगा पडतायत. लिप बाम वापरले, पण फारसा काही फायदा झाला नाही. काय करावे?: हवामानात बदल झाला की आपल्या शरीरातही त्याप्रमाणे बदल होत असतात. सध्या कधी एकदम उष्ण वातावरण असते, रात्री मधेच गार होते. थोडक्यात, हवामान सारखे बदलते. त्यामुळे त्वचा, ओठ आणि पायांना कोरडेपणा येतो. सीझन चेंज होत असताना आपण आपल्या आहाराकडे आणि पाणी कितपत पितोय ह्याकडे लक्ष द्यावे. शरीर डीहायड्रेट झाले की ओठ उलतात. त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत राहा. पाणी पिताना एकेक घोट प्यावे. रात्री झोपताना ओठांना गायीचे तूप लावावे. लगेच फायदा होईल. लिप बाम घेताना त्यात सगळे नैसर्गिक घटक आहेत ना, ते तपासून घ्यावे. शे-बटर किंवा कोको बटरयुक्त लिप बाम लावू शकता. ओठ उललेले असताना लिपस्टिक लावणे टाळावे.टाचेला भेगा खूपच पडल्या असतील, तर पेडिक्युअरची काही सेटिंग घ्या, फायदा होईल. रात्री फूट क्रीम लावून मोजे घालून ठेवा, भेगा लगेच भरून निघतील.---------------------.Open Book Test म्हणजे ‘पुस्तकात बघून पेपर लिहा’ एवढाच अर्थ होतो का? जाणून घ्या ही संकल्पना आणि तज्ज्ञांचे मत.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.