स्वप्ना सानेसनस्क्रीनमधील काही घटक असे असतात, ज्यामुळे त्वचेवर घाम येऊ शकतो. सनस्क्रीन त्वचेवर एक लेअर तयार करते, ज्यामुळे तीव्र यूव्हीए आणि यूव्हीबी किरणे रिफ्लेक्ट होतात. ह्यासाठी तुम्ही बाहेर जायच्या २० ते २५ मिनिटे आधी त्वचा मॉइस्चराईझ करावी आणि....माझ्या डोळ्यांभोवती गेल्या दीड वर्षांपासून डार्क सर्कल्स आहेत? ती घालवण्यासाठी काय करता येईल?डोळ्याभोवती काळी वर्तुळे येण्याची अनेक कारणे असू शकतात. मुख्य कारण असू शकते ते म्हणजे शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता. डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए, डी, ई, के, बी १२, आयर्नयुक्त भाज्या, फळे जर योग्य प्रमाणात सेवन केल्या जात नसतील, तर दृष्टी कमकुवत होऊन डोळ्यांवर ताण पडतो आणि त्यामुळे तिथली त्वचा, जी अतिशय नितळ असते, ती डार्क होते. ह्याबरोबरच उशिरा झोपणे, झोप कमी होणे किंवा शांत झोप नसणे आणि अति झोप झाली तरी ही डार्क सर्कल्स येऊ शकतात. अतिरिक्त ताणामुळेसुद्धा असे होऊ शकते. अथवा सारखे डोळे चोळल्यामुळेदेखील तिथल्या ब्लड व्हेसल ब्रेक होतात अन् त्वचा काळसर दिसते. तसेच, आनुवंशिक कारणदेखील असू शकते. ज्यांना चष्मा असतो, त्यांना डार्क सर्कल्स येऊ शकतात. ज्यांचे सतत कॉम्प्युटरवर काम असते त्यांचीही डोळ्याभोवतीची त्वचा काळवंडू शकते. हल्ली सगळेच रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर करतात, त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि डोळे थकतात. त्यामुळेसुद्धा तिथली त्वचा डार्क दिसते. शिवाय कुठले आजारपण असल्यास किंवा त्यामुळे विकनेस आल्यास डोळे थकतात आणि त्याभोवती डार्क सर्कल येतात. तुमची लाइफस्टाइल कशी आहे, ह्यावर ही डार्क सर्कल येणे अवलंबून आहे. अतिरेकी जंक फूड खाणे, स्मोकिंग करणे, मद्यपान करणे हेसुद्धा याला कारणीभूत ठरू शकते.थकवा आल्यामुळे जर डोळ्यांभोवती डार्क सर्कल्स आले असतील, तर ते घालवता येतात. कारण ते टेम्पररी असतात. पण इतर कारणे असतील, तर त्यासाठी रोज डोळ्यांची काळजी घ्यावी लागते. पोषक आहार घ्यावा, हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करावी. स्ट्रेस कमी करण्यासाठी मेडिटेशन, व्यायाम करावा. स्क्रीनवर काम करताना दर २० मिनिटांनी पाच मिनिटांचा ब्रेक घ्यावा. डोळे रिलॅक्स करण्यासाठी डोळ्यांचे व्यायाम करावेत. .काही होम मेड उपाय केल्यास डार्क सर्कल्स कमी होऊ शकतात :-वापरलेल्या टी-बॅग फ्रीजमध्ये गार करायला ठेवाव्यात. नंतर त्या १० ते १५ मिनिटे डोळ्यांवर ठेवायच्या. डोळ्यांचा थकवा जातो आणि पफीनेसही कमी होतो.काकडी, बटाटा ह्यांच्या चकत्या करून डोळ्यावर ठेवाव्यात व १० मिनिटे आरामात बसावे. असे रोज केल्यास काही दिवसांत फरक जाणवेल.ॲलोव्हेरा जेलमध्ये थोडी कॉफी मिक्स करून हा पॅक डोळ्याभोवती लावावा. १५ मिनिटांनी गार पाण्याने धुऊन घ्यावा. असे एक आठवडा रोज करावे. नंतर एक दिवसाआड, आणि त्यानंतर आठवड्यातून दोन वेळेस नियमित करावे. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.उन्हात जाताना गॉगल्स नक्की वापरावेत.ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर काम असेल, तर सोबत एका डबीमध्ये टिशू पेपर किंवा पातळ सुती कपड्याची घडी किंवा कापसाचे चौकोनी पॅड कट करून घ्यावे. त्यात गुलाबजल टाकून फ्रिजमध्ये गार करायला ठेवावे. ही डबी ऑफिसमध्ये आपल्यासोबत ठेवावी. दिवसातून दोन वेळा तरी तुम्ही ते गुलाबजलयुक्त थंड आय पॅक वापरू शकता. नक्कीच फायदा होईल. ह्याच प्रकारे तुम्ही कॉफीचे पाणी करून त्याचे पॅड लावू शकता, डोळ्यांभोवतीचे काळे डाग नक्कीच कमी होतील.रात्री झोपताना चांगल्या कंपनीचे आय क्रीम अथवा जेल डोळ्याभोवती लावावे.दिवसातून एकदा तरी डोळ्यांचे व्यायाम करावेत. हल्ली बरेच योगगुरूंचे व्हिडिओ इंटरनेटवर असतात. ते बघून किंवा तज्ज्ञांकडून शिकून घ्यावे आणि नियमित डोळ्यांचे व्यायाम करावेत.डार्क सर्कल एकदा आले, की ते लगेच कमी होत नाहीत. आपल्या रुटीनमध्ये बरेच बदल करावे लागतात, हेल्दी लाइफस्टाइल आत्मसात करावी लागते.सनस्क्रीन लावल्यावर खूप घाम येतो, त्यासाठी काय करावे?सनस्क्रीनमधील काही घटक असे असतात, ज्यामुळे त्वचेवर घाम येऊ शकतो. सनस्क्रीन त्वचेवर एक लेअर तयार करते, ज्यामुळे तीव्र यूव्हीए आणि यूव्हीबी किरणे रिफ्लेक्ट होतात. ह्यासाठी तुम्ही बाहेर जायच्या २० ते २५ मिनिटे आधी त्वचा मॉइस्चराईझ करावी आणि त्यावर सनस्क्रीन लावावे. थोड्या वेळात घाम आला की टिशू घेऊन टिपून घ्यावा. साधारण एकदाच घाम येतो, नंतर येत नाही. आता हलके कॉम्पॅक्ट पावडर किंवा फेस पावडर चेहऱ्याला लावून ती सेट करावी. चेहरा एकदम फ्रेश राहील. सनस्क्रीन मात्र दर तीन तासांनी परत लावावे लागणार, तरच त्याचा फायदा होतो. .स्विमिंग करताना टॅन होऊ नये ह्यासाठी काय करता येईल?स्विमिंग करताना टॅन न होण्यासाठी एकतर पहाटे स्विमिंग करायला जावे किंवा उन्हे उतरल्यावर जावे. शक्यतो सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंतच्या वेळा टाळाव्यात. ह्यावेळेस उन्हाची तीव्रता जास्त असते. पोहायला सुरुवात करण्याच्या २० मिनिटे आधी सनस्क्रीन जरूर लावावे. वॉटरप्रूफ सनस्क्रीन आणि स्विमिंगसाठी वेगळे सनस्क्रीन उपलब्ध आहे, ते वापरावे. स्विमिंग टॅंकमध्ये क्लोरिन असल्यामुळे ते सनस्क्रीन फार वेळ टिकत नाही. त्यामुळे तासाभराने परत सनस्क्रीनचा लेअर लावावा.शक्य असल्यास इनडोअर स्विमिंग पूलमध्ये जावे. तिथे निदान उन्हामुळे टॅन होणार नाही. पाण्यातील क्लोरिनमुळे त्वचा थोडीफार काळवंडते, पण त्यासाठी नंतर अँटी टॅन पॅक लावता येतो.स्विमिंग करून आल्यानंतर शॉवर घेऊन त्वचा लगेच हायड्रेट करावी. ओलसर त्वचेमध्ये मॉइस्चरायझर लगेच सामावून जाते. होममेड अँटी टॅन पॅक तयार करायला दोन चमचे कॉफी पावडरमध्ये थोडे नारळाचे तेल आणि थोडी साखर घालावी. मिक्स करून टॅन झालेल्या भागाला १५ मिनिटे लावून घ्यावे. नंतर हलक्या हाताने स्क्रब करत धुऊन घ्यावे. लगेच फरक जाणवेल.---------------निवेदनथंडीत पायांना खूप भेगा पडतात, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स तयार झाली आहेत, ओठ खूप फुटतात, कोंडा काही केल्या जात नाही... तुम्हालाही जाणवतात का अशा समस्या? त्यावर उपाय सापडत नाहीये? मग तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा, आम्ही या सदरातून त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.saptahiksakal@esakal.com या ई-मेलवर तुमचे प्रश्न पाठवा. ई-मेलच्या विषयात ‘ब्यूटी केअर’ असा उल्लेख करायला आणि सोबत तुमचा फोन नंबर लिहायला विसरू नका..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.