या प्रयोगशाळांच्या संशोधनातून मृदा बदलांबरोबरच पिकांच्याही सद्य आणि भविष्यकालीन स्थितीचा अचूक अंदाज वर्तवणारे तंत्रज्ञान या संस्थेने विकसित केले आहेत. शेतजमीन वापर नियोजन विभाग मृदाविज्ञानाशी संबंधित सर्व तंत्रविज्ञान शाखांच्या मदतीने तसेच शेतकऱ्यांच्या सहभागातून उपक्रम राबवले जातात. उपक्रम राबवलेल्या गावांच्या पीक उत्पादनात झालेले सकारात्मक बदल सर्वदूर पोहोचवले जातात. याखेरीज शेतकऱ्यांसाठी शेती-पर्यावरण मृदा आणि पाणी विश्लेषण शेतजमीन वापर तंत्र या विषयांचे प्रशिक्षण घेतले जाते.