भक्ती बिसुरेव्यक्ती असो, संस्था किंवा एखादी वस्तू... तिच्या आयुष्यातली ५० वर्षे हा काही थोडाथोडका काळ नाही. त्यात ती वस्तू रुबिक्स क्यूबसारखी शब्दशः जगाच्या कानाकोपऱ्यातील घराघरांत पोहोचलेली असेल तर ५० वर्षांचा हा प्रवास आणखी विशेष ठरतो. .एखादी वस्तू ‘खेळणं’ म्हणून हातात येते आणि कोणत्याही वयातला कोणीही, काही काळ का असेना कामधाम सोडून त्या खेळण्यात गुंतून जातो, असं फार क्वचितच होत असावं. रुबिक्स क्यूबनं मात्र ही किमया सहज साधली आहे. रुबिक्स क्यूब (Rubik's Cube) माहिती नाही अशी व्यक्ती सापडणं तसं अवघडच... लाल, पांढरा, निळा, केशरी अशा रंगांतल्या चौकोनांचा हा ठोकळा हातात पडला की लहान मुलं असोत की त्यांचे आईबाबा, आजीआजोबा, सगळेच हातातलं काम विसरून त्या ठोकळ्याच्या सहाही पृष्ठभागांवर एकाच रंगाचे चौकोन आणण्याचा खटाटोप करताना तुम्हाला अनेकदा दिसले असतील. एका पृष्ठभागावर एकच रंग असेल अशी रचना करणं म्हणजे रुबिक्स क्यूब ‘सोडवणं’, आणि मोह भल्याभल्यांना होतो. काहींना तो अगदी लिलया सोडवता येतो. काहींची मात्र तो झोप उडवतो. आपण ज्याला खेळणं म्हणतो तो रुबिक्स क्यूब हे प्रत्यक्षात खेळणं नसून एक थ्रीडी कॅाम्बिनेशन पझल किंवा कोडं आहे, हे तुम्हाला माहितीये?सध्याच्या आभासी युगातही लोकप्रियता न ओसरलेल्या रुबिक्स क्यूबचा शोध लावला तो हंगेरीतल्या एर्नो रुबिक नावाच्या शिल्पकार-प्राध्यापकानं. मुळात गणिताच्या विद्यार्थ्यांना त्रिमितीय वस्तू समजाव्यात म्हणून निर्माण झालेला हा क्यूब असा जगभर लोकप्रिय होणार आहे, तो सोडविण्याच्या स्पर्धा होणार आहेत, त्याच्यावर सिनेमे आणि शो तयार होणार आहेत याची एर्नो रुबिक यांनी कधी कल्पनाही केली नसेल, पण तसं झालेलं त्यांनी याची देही याची डोळा अनुभनवलं खरं! जगभरातल्या आबालवृद्धांना वेड लावणारा रुबिक्स क्यूब नुकताच ५० वर्षांचा झाला. या पन्नास वर्षांत किती तरी नवीन ‘खेळणी’ आली आणि गेली. पण लोकप्रियता आणि गेम्सच्या ‘महापुरात’ टिकून राहणं या निकषांवर ती रुबिक्स क्यूबच्या जवळपासही पोहोचू शकलेली नाहीत..रुबिक्स क्यूब सोडवणं जेवढं इंटरेस्टिंग आहे तेवढीच त्याची गोष्टही इंटरेस्टिंग आहे. १९७४मध्ये एर्नो रुबिक यांनी या क्यूबचा शोध लावला तेव्हा तो मॅजिक क्यूब म्हणून ओळखला जात असे. १९८०मध्ये त्याचं नामकरण रुबिक्स क्यूब असं झालं. सात-आठ वर्षांतच या क्यूबचं प्रस्थ एवढं वाढलं, की १९८२मध्ये जगातली पहिली रुबिक्स क्यूब वर्ल्ड चॅंपियनशिप (रुबिक्स क्यूबच्या जन्मगावात) बुडापेस्टमध्ये झाली होती. ही स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धकाने अवघ्या २२.९५ सेकंदात रुबिक्स क्यूब सोडवला होता. १९८७मध्ये रुबिक्स क्यूब आंतरराष्ट्रीय स्तरावर लॉँच करण्यात आला. तेव्हा जगभर सुमारे १४ मिलियन क्यूब्ज विकले गेले होते, असं उपलब्ध डेटा सांगतो.एर्नो रुबिक यांचा हा क्यूब आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा असला तरी त्यापूर्वीही असा क्यूब तयार करण्याचे प्रयोग झाले होते. मार्च १९७०मध्ये लॅरी निकोल्स यांनी दोन बाय दोन बाय दोन आकाराचा चुंबकाने जोडलेला आणि हवा तसा फिरणारा क्यूब तयार केला होता. एप्रिल १९७२मध्ये अमेरिकेत या क्यूबला पेटंटही मिळालं होतं. दुसरीकडे तीन बाय तीन बाय तीन आकाराचा क्यूब फ्रँक फॅाक्स याने एप्रिल १९७०मध्ये तयार केला होता. त्याला १९७४मध्ये ब्रिटनमध्ये पेटंट मिळालं होतं. पण एर्नो रुबिक यांच्या रुबिक्स क्यूबने लोकप्रियतेच्या निकषावर या सगळ्यांना कधीच मागे टाकलं.रुबिक्स क्यूबचा शोध हा खरोखरच इनोव्हेटिव्ह आहे. आजच्या काळाच्या भाषेत सांगायचं तर तो मिनिमलिस्ट शोध आहे. रुबिक्स क्यूब सोडवणं म्हणजे मेंदूचा व्यायाम आहे. (विश्वकोशातल्या नोंदीनुसार सहा पृष्ठभाग व सहा वेगवेगळे रंग यामुळे ते पृष्ठभाग फिरवत राहिल्यास ४२३,५२,००,३२,७४,४८,९८,५६,००० -अंदाजे ४.३ x १०१९- इतक्या रचना शक्य आहेत.) आजकाल डिजिटल गेमिंगने अनेकांना अक्षरशः झपाटलेलं आपण बघतो. रुबिक्स क्यूब सोडवणं हा मात्र लक्ष एकाग्र करण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी पडणारा खेळ आहे. तो सोडवण्यामुळे मनावरचा ताण कमी होतो. त्या अर्थानं तो ‘स्ट्रेस बस्टर’ आहे. मात्र असं असलं तरी रुबिक्स क्यूबचंही काहींना व्यसन लागतं, असा इशारा अभ्यासक देत असतात.आज सहस्रचंद्रदर्शनाच्या वयात असणाऱ्या एर्नो रुबिक यांचा जन्म जुलै १९४४मधला, बुडापेस्टचा. तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. एर्नोचे वडील एका विमान कारखान्यात फ्लाइट इंजिनिअर होते आणि आई कवयित्री. आपले वडील हे आपलं प्रेरणास्थान असल्याचं एर्नो अनेक मुलाखतींमध्ये आवर्जून सांगतात. ते म्हणतात, ‘माझ्या वडिलांकडून मी खूप शिकलो. त्यांच्यामध्ये अक्षरशः इकडचं जग तिकडे करायची क्षमता होती. त्यांनी एकदा एखादी गोष्ट करायचं ठरवलं तर त्यापासून त्यांना परावृत्त करणं अशक्य होतं. त्यांच्यासाठी कुठलंही काम लहान मोठं नव्हतं!’ १९७१ ते १९७९ या काळात एर्नो रु बुडापेस्ट कॉलेज ॲाफ अप्लाईड आर्ट्समध्ये आर्किटेक्चरचे प्रोफेसर होते. याच काळात त्यांनी त्यांच्या मॅजिक क्यूबचा पहिला प्रोटोटाइप तयार केला. हा प्रोटोटाइप लाकडाचा होता. आपल्या विद्यार्थ्यांना ‘टास्क’ म्हणून आपण तो तयार केल्याचं ते सांगतात. १९७५मध्ये कोडं म्हणून त्याच्या पेटंटसाठी त्यांनी अर्ज केला.हंगेरीतील कम्युनिस्ट राजवट आणि आर्थिक धोरणांमुळे त्या काळात या क्यूबचं उत्पादन करणं शक्य नव्हतं. पुढे १९७९मध्ये एर्नो यांनी त्यांच्या क्यूबच्या उत्पादनाची जबाबदारी अमेरिकेतल्या आयडियल टॅाइज या कंपनीला दिली. याच कंपनीने मॅजिक क्यूब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्यूबला ‘रुबिक्स क्यूब’ अशी ओळख दिली.पहिला प्रोटोटाइप ते उत्पादन हा प्रवास व्हायला सहा वर्षांपेक्षा जास्त वेळ गेला खरा, पण बाजारात आल्यानंतर रुबिक्स क्यूब एका रात्रीत लोकप्रिय झाला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पुढचा सगळाच इतिहास आहे!.रुबिक्स क्यूबने अनेक ‘टॉय ॲाफ द इयर’ अवॅार्ड्स पटकावली. १९८०च्या दशकाचा रुबिक्स क्यूब जणू अविभाज्य भागच ठरला. आत्तापर्यंत जगभरात सुमारे ३५० मिलियन रुबिक्स क्यूब विकले गेले आहेत. त्यामुळेच ‘बेस्ट सेलिंग टॉय ॲाफ ॲाल टाइम’ म्हणूनही रुबिक्स क्यूबचा लौकिक आहे. आतापर्यंत दोन बाय दोन एवढा चिमुकला ते २१ बाय २१ एवढ्या प्रचंड आणि यामधल्या सर्व लहानमोठ्या आकारांमध्ये रुबिक्स क्यूब बनवले गेले आहेत. रुबिक्स क्यूबची ही लोकप्रियता हीच एर्नो रुबिक यांच्या कामाची पोचपावती, असं म्हणणं चुकीचं नसलं तरी ते पुरेसंही ठरणार नाही. रुबिक यांचं काम रुबिक्स क्यूब निर्मितीपेक्षा किती तरी जास्त असलं, तरी जगभरामध्ये त्यांच्या कामाची दखल मात्र प्रामुख्याने रुबिक्स क्यूबचा जनक म्हणूनच घेण्यात आली. कितीतरी मोठमोठ्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यातही आलं आहे.रुबिक्स क्यूबने जगभरातील आबालवृद्धांना वेड लावल्यानंतर तो सोडविण्याच्या स्पर्धा झाल्या नसत्या तरच नवल होतं! कमीतकमी वेळेत रुबिक्स क्यूब सोडविण्याला स्पीडक्युबिंग किंवा स्पीडसॅाल्व्हिंग असं म्हटलं जातं. जगभर स्पीडक्युबिंगच्या अक्षरशः असंख्य स्पर्धा होतात. १९८१मध्ये गिनिज बुक ॲाफ वर्ल्ड रेकॅार्ड््सतर्फे म्युनिकमध्ये स्पीडक्युबिंगची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांनी अवघ्या ३८ सेकंदात क्यूब सोडवला. पुढे १९८२मध्ये बुडापेस्ट शहरात पहिली रुबिक्स क्यूब वर्ल्ड चॅंपियनशिप झाली होती. लॅास एंजेलिसहून आलेल्या एका व्हिएतनामी विद्यार्थ्याने या स्पर्धेत फक्त २२.९५ सेकंदात क्यूब सोडवला. वर्ल्ड क्यूब असोसिएशन ही संघटना रुबिक्स क्यूब सोडविण्याच्या जागतिक विक्रमांच्या नोंदी ठेवते. या संघटनेकडून डोळ्यांवर पट्टी बांधून क्यूब सोडविण्याच्या किंवा डोळ्यांवर पट्टी बांधून एकापेक्षा अनेक क्यूब एकामागोमाग एक सोडविण्याच्या स्पर्धाही घेतल्या जातात. एकाच हाताचा वापर करून क्यूब सोडवणं, कमीत कमी पायऱ्या वापरून क्यूब सोडवणं अशा स्पर्धाही होतात आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद प्रचंड असतो. या सगळ्यावरून रुबिक्स क्यूबची लोकप्रियताच अधोरेखित होते.‘कंटेंट’ हा आपल्या आजकालच्या जगण्यातला परवलीचा शब्द झालाय. या ‘कंटेंट’ निर्मितीतही रुबिक्स क्यूबचं योगदान प्रचंड आहे. क्यूब कसा सोडवायचा याच्या टिप्स, हॅक्स आणि ट्युटोरिअल्स देणारे हजारो व्हिडिओ यूट्यूबवर आहेत. पुस्तकं आहेत. रुबिक्स क्यूबशी जोडलेल्या रंजक गोष्टी सांगणारे लेख आणि बातम्या यांचा तर इंटरनेटवर अक्षरशः खजिना आहे. हा कंटेंट वाचताना आणि पाहताना अनेक वर्षांत रुबिक्स क्यूब हातात न घेतलेल्या कुणालाही तो घेऊन सोडवावा असं वाटेल एवढं नक्की!आणि हे शब्दशः खरं आहे. शाळेत वगैरे असताना केव्हातरी एकदा पुण्या-मुंबईहून येताना मामाने आणलेल्या भेटींच्या खजिन्यातून हा गडी आमच्या घरात दाखल झाला. त्यानंतर अर्थातच त्याने आम्हाला सगळ्यांना वेड लावलं. खेळांचं आणि माझं सख्य तसं कमीच. त्यामुळे ‘अवघ्या काही सेकंदांत’ वगैरे तो सोडवणं मला कधी साधलं नाही. पण बहुदा कुठल्या तरी एका सतराशेसाठाव्या प्रयत्नात तो माझ्या हातून ‘सुटला’ तेव्हा झालेला आनंद काही वेगळाच होता! असो..रुबिक्स क्यूब आबालवृद्धांचा लाडका झाला, असं म्हणताना कित्येक सेलिब्रिटींनाही त्याने वेड लावलं हे विसरता येणार नाही. विल स्मिथ, जस्टिन बिबर, स्टिफन करी, ब्राझीलचा फुटबॅालपटू फिलिप लुई, ख्रिस प्रॅट, ग्रॅण्डमास्टर फ्लॅश असे अनेक सेलिब्रिटी रुबिक्स क्यूब सोडवण्यात माहीर आहेत. द परस्युट ॲाफ हॅपिनेस सिनेमात विल स्मिथने साकारलेलं पात्र रुबिक्स क्यूब सोडवतं. त्यामुळे एका रिॲलिटी शोमध्ये त्याला रुबिक्स क्यूब सोडवण्यास सांगण्यात आलं तेव्हा विल स्मिथने एका मिनिटापेक्षा कमी वेळात तो सोडवला होता. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॅार्ज डब्ल्यू बुश हेही रुबिक्स क्यूब सोडवतात. अनेक भारतीय सेलिब्रिटीही अत्यंत आवडीने रुबिक्स क्यूब सोडवतात. त्यातलं पहिलं नाव आहे ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीर खानचं! आमीर खानकडून आपल्याला रुबिक्स क्यूब सोडवायला शिकायचा आहे, असं विराट कोहलीने एका मुलाखतीत म्हटलं होतं.व्यक्ती असो, संस्था किंवा एखादी वस्तू... तिच्या आयुष्यातली ५० वर्षे हा काही थोडाथोडका काळ नाही. त्यात ती वस्तू रुबिक्स क्यूबसारखी शब्दशः जगाच्या कानाकोपऱ्यातील घराघरांत पोहोचलेली असेल तर ५० वर्षांचा हा प्रवास आणखी विशेष ठरतो!लोकप्रियता टिकवून ठेवायची असेल तर आपण काळाबरोबर बदलायला हवं, हे रुबिक्स क्यूबलाही मान्य आहे. त्यामुळे विशेष निमित्त असतील तर रुबिक्स क्यूबच्या स्पेशल एडिशन्स येत राहातात. ५०व्या वर्धापनदिनाचं निमित्त साधूनही अशा स्पेशल एडिशन्स येणार आहेत. त्यामध्ये बॅटमॅ न, ब्लॅक पॅंथर, बार्बी, हॅलो किटी या थीम्सवरचे रुबिक्स क्यूब येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.रुबिक्स क्यूब ५० वर्षांचा झाला हे प्रत्यक्ष त्याच्या जन्मदात्याला म्हणजेच एर्नो रुबिक यांनाही ‘अनबिलिव्हेबल’ वाटतं. आजकालच्या डिजिटल जगात आपल्याला हात आहेत हे आपण विसरत चाललोय. पण रुबिक्स क्यूब सोडवताना हात हे आपलं पहिलं ‘टूल’ आहे याची आठवण कायम राहाते, असं रुबिक सांगतात. स्पीडक्युबिंग आणि रुबिक्स क्यूब सोडविण्याच्या असंख्य क्लृप्त्या इंटरनेटवर सतत व्हायरल होत असतात. कितीतरी तरुण मुलं डान्स करताना, पियानो वाजवताना किंवा अगदी रॅप करतानाही रुबिक्स क्यूब सोडवतात याची त्यांना गंमत आणि कौतुक वाटतं. ‘तुमचं मूल आणि त्याला मिळणारी प्रचंड लोकप्रियता बघणं कधीतरी अत्यंत थकवणारं असतं, अशा वेळी तुम्हाला एक पाऊल मागे यावं लागतं’ असंही रुबिक म्हणतात. २०२०मध्ये त्यांचं क्यूब्ड नावाचं पुस्तक आलं. त्यात ते लिहितात, ‘खरं सांगू का, जगावर छाप सोडायचा वगैरे माझा काही विचार नव्हता, मला फक्त एक कोडं तयार करायचं होतं आणि मी ते केलं!’हात आणि मन यांच्यातला संबंध जपण्यास क्यूबची मदत होते हे रुबिक यांच्या मते मानवाच्या विकासातील या क्यूबचं सर्वात महत्त्वाचं योगदान आहे. गेल्या ५० वर्षांतल्या कित्येक पिढ्या रुबिक्स क्यूब नामक भन्नाट खेळण्यासाठी आणि या पिढ्यांच्या विकासातील त्याच्या योगदानासाठी एर्नो रुबिक यांच्या ऋणात राहणार आहेत, हे नक्की!(भक्ती बिसुरे मुक्त पत्रकार आहेत.)----------------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.