डॉ. आशुतोष जावडेकरलेखक आणि लेखन यातले अनुबंध उलगडणारे सांगीतिक संदर्भ आणि त्यानं श्रीमंत होणारे आपण वाचक! साधं पुस्तक वाचायचं तरी केवढ्या गोष्टी आसपास असतात, नाही? आणि त्यातली एक गोष्ट चक्क गाण्याची असते हे आपण कायम लक्षात ठेवायचं असतं! .कुठलंही पुस्तक वाचताना त्यामागचे संदर्भ महत्त्वाचे असतात. म्हणजे कथानक घडतं कुठे, कुठल्या काळात हे वाचण्याच्या ओघात आपल्याला कळतं. आणि मराठी पुस्तक वाचताना आपण हे संदर्भ अनेकदा गृहीत धरतो. कारण ते आपलेच असतात! मावळातला पाऊस कसा असतो आणि कोकणातल्या समुद्रावर कसं वाटतं हे आपल्याला माहीत असतं. तुम्ही कुठल्याही शहरात राहत असाल तरी वेगवेगळ्या बोलींमध्ये बोलणारी मराठी माणसं तुम्हाला भेटून गेलेली असतात. इथले सणवार माहीत असतात. इथल्या रीती-पद्धती ठाऊक असतात, कारण त्या आपल्याच असतात. इंग्रजी वाचताना येणारा सगळ्यात मोठा अडसर हा या संदर्भांचा असतो.कुठल्या गाण्याचा संदर्भ कथानकाच्या ओघात आला, तर आपल्याला ते गाणं किंवा त्यामागची सांगीतिक परंपरा माहीत नसते. एखादं कथानक कुठल्या भूभागात घडतं हे वाचताना कळलं, तरी तो नक्की भूभाग कसा आहे, दिवस दिवस रात्र असते आणि अखंड बर्फ पडतो, म्हणजे नक्की त्या थंडीत माणसाला कसं वाटतं हे आपल्याला माहीत नसतं. किंवा अनेक इंग्रजी पुस्तकं वाचताना विशिष्ट धर्म किंवा पंथाचे संदर्भ आले तर आपल्याला ते माहीत असतातच असं नाही. कधीतरी आपण गुगल करू, परंतु तरीही अनेकदा त्या संदर्भांची दुनिया आपल्यासाठी परकी राहते. दुर्दैवाने त्यामुळे आपल्याला ते पुस्तकदेखील थोडसं परकं वाटू लागतं. त्यामुळे इंग्रजी पुस्तक वाचताना त्यामागची संदर्भाची दुनिया आधी जाणून घेणं मोलाचं असतं.हे संदर्भ आपल्याला कुठं जाणून घेता येतील ? गुगलबाबा तर मदतीला असतोच, परंतु इंग्रजी साहित्याला वाहिलेल्या काही विशिष्ट वेबसाइट्स आहेत, तिथं आपल्याला त्या त्या पुस्तकामागचा एकंदर संदर्भपट समजू शकतो. इंग्रजीमधील ‘क्लासिक’ म्हणवली जाणारी जी पुस्तकं आहेत, त्याच्या नोट्स Sparknotes किंवा Cliffnotesमध्ये मिळतात. आणि त्या अवश्य वाचाव्यात. Shmoop, Litcharts, Enotes, Study, Coursehero या अजून काही उल्लेखनीय वेबसाइट्स. इथे जुन्या आणि नव्या अनेक पुस्तकांमागचे संदर्भ आपल्याला लिलया कळू शकतात. सगळ्या संदर्भांपैकी स्थळ आणि काळ हे दोन संदर्भ सगळ्यात मोलाचे असतात. विलायती वाचतानाच्या आगामी लेखांमध्ये आपण त्यावर सविस्तर बोलणार आहोत. कारण एखादं कथानक घडतं तिथला भूभाग, तिथलं हवामान, आणि तो काळ हे अत्यंत महत्त्वाचे असतात. कधीकधी तर ते स्थळ पूर्ण काल्पनिक असतं. विज्ञानकथांमध्ये हे आपल्याला अधिक आढळतं. आता मिथकथांचा पुन्हा एकदा जोरदार बाजारात रेटा आला आहे. तिथलेही संदर्भ अनेकदा काल्पनिक असतात. अमीश त्रिपाठी यांच्या पुस्तकांमधील मेलूहा ही भूमी म्हटली तर काल्पनिक आणि म्हटली तर सिंधू भूमीच्या जवळ जाणारी. या सगळ्या मजा आपण नंतर बघणार आहोत. आजच्या लेखात सहज सांगीतिक संदर्भ बघूया. संगीत ही अद्भुत कला आहे. आणि साहित्यामध्ये अनेकदा संगीत कळत-नकळत उमटत असतं. शब्द आणि सूर यांची तशी ही मैत्री नेहमीच जोरात असते!झुंपा लाहिरीच्याThe Namesake या कादंबरीतील हा प्रसंग बघा. गोगोल हा अमेरिकेत वाढलेला बंगाली आई-वडिलांचा मुलगा. त्याचा आज वाढदिवस आहे. आणि तो पक्का अमेरिकी टीनएजर झाला आहे. त्याच्या खोलीत त्याचे वडील प्रवेश करतात. .ज्या रशियन लेखकावरून त्यांनी स्वतःच्या मुलाचे हे टोपण नाव ठेवलेलं असतं त्या लेखकाचं - निकोलाय गोगोल याचं - पुस्तक ते त्याला बक्षीस म्हणून देतात. तो ते घेतो खरा पण मग त्याचं मन तिथं नाही. वडील एका नजरेनं टिपतात की त्यांनी मागच्या वर्षी दिलेली भारतीय शास्त्रीय संगीताची कॅसेट न फोडता जशीच्या तशी गोगोलच्या बेडरूमच्या फडताळावर आहे. आणि शेजारी जॉन लेननचा फोटो!‘बीटल्स’ या जगप्रसिद्ध रॉक कंपूमधील जॉन हा गायक गीतकार आणि संगीतकार. तो ब्रिटिश असला तरी त्याचं अमेरिकेशी वेगळं नातं होतं. आणि त्याचा शेवटदेखील अमेरिकेतच झाला. न्यू यॉर्कच्या मॅनहटन बेटावर सेंट्रल पार्कजवळ डाकोटा या इमारतीतून बाहेर पडताना त्याच्यावर गोळी झाडली गेली. ही गोष्ट १९८० सालची.आता लेननचा हा संदर्भ माहीत नसेल तर पटकन या प्रसंगातील मेख आपल्याला लक्षात येणार नाही. गोगोल हा दुसऱ्या पिढीतील स्थलांतरित आहे. तो जरी रक्तानं भारतीय असला तरी वृत्तीनं आणि वळणानं अमेरिकी असणार हे उघड आहे. त्याचे वडील स्वाभाविकपणे आपली भारतीय सांकेतिक संस्कृती त्याच्यापर्यंत पोहोचावी म्हणून प्रयत्न करत आहेत.पण एकाच फडताळावर मागच्या वर्षी वाढदिवसाला दिलेली, अजूनही गिफ्ट पेपरमध्ये तशीच असलेली ती भारतीय शास्त्रीय संगीताची कॅसेट आणि शेजारचा लेननचा स्मृती-फोटो या गोष्टी पुष्कळ काही सांगतात. स्थलांतरितांचे ताणेबाणे हे असे एखाद्या सांगीतिक संदर्भानेदेखील झुंपा लाहिरीसारखी सिद्धहस्त लेखिका जिवंत करू शकते.टोनी मॉरीसन ही मला अत्यंत आवडणारी लेखिका. तिला नोबेल पारितोषिक मिळालं हा त्या पारितोषिकाचा सन्मान आहे. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचं जग तिच्या समग्र साहित्यातून तिनं नुसतं उभं केलं नाही, तर अनेकांना पचवायला भाग पाडलं! कृष्णवर्णीय संगीत हा अमेरिकी संगीतातील लखलखता धागा आहे.किंबहुना आज असलेले अनेक संगीत प्रकार हे कृष्णवर्णीयांच्या पारंपरिक लोकसंगीतांमधून, ब्ल्यूज म्युझिक किंवा जॅझमधूनच उगमाला आले आहेत. ‘ब्ल्यूज संगीत’ म्हणजे तरी नेमकं काय? ऑक्सफर्ड शब्दकोश सांगतो - ‘कृष्णवर्णीय लोकांच्या लोकगीतांपासून उपजलेलं, नैराश्य आणि दुःखाच्या भावना मांडणारं संगीत म्हणजे ‘ब्ल्यूज’.’पिकोला या कृष्णवर्णीय युवतीचा गोऱ्या मुलीसारखे सुंदर सोनेरी केस आणि निळेभोर डोळे मिळवण्याचा अट्टाहास आणि त्या भ्रमनिरासातून अंतिमतः वेडात होणार तिचं पर्यवसन म्हणजे टोनी मॉरिसन यांची The Bluest Eye ही अफाट कादंबरी! त्याचा शीर्षकातील जो ब्लू आहे, तोच मुळात ब्ल्यू संगीताचं नातं सांगणारा आहे हे आपल्याला आधी कळणं अशक्य असतं.म्हणूनच थोडा अभ्यास करून एखाद्या पुस्तकाकडे गेलं, की शीर्षकापासून एखादा लेखक आशय कसा उंचावत नेतो हे कळतं. या पुस्तकात क्लाडिया ही अजून एक मुलगी आहे. तीदेखील कृष्णवर्णीय आहे, तीदेखील रोज अन्यायाला तोंड देते, परंतु तिच्या घरी तिचे आई आणि वडील काळजी घेणारे असल्यानं ती हरत, हरवत नाही.आणि तिच्या दैनंदिन जखमा भरण्याच्या मागं गाणं असतं. क्लाडियाची आई लोकांकडे घरकामं करीत असते. परंतु ती कामं करताना मागं हळू आवाजात सुंदर गाणी गात असते. क्लाडियाची दैनंदिन शाळकरी दुःखं ती हिरवी आणि निळी वेदनांची अभिव्यक्ती करणारी गाणी ऐकताना हलकी होतात. तिच्या आईचा गाता आवाज तिचं दुःख हरण करतोच, पण तिची तिलाही जाणीव होते - ‘‘... that pain was not only endurable, it was sweet!’’टोनी मॉरिसन यांनी स्वतःच लिहून ठेवलं आहे, की त्यांनी या पुस्तकात ब्ल्यूज आणि जॅझ संगीताचा परिणाम साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्या संगीतातील काही तत्त्वं लेखिकेनं संहितेमध्ये वापरली आहेत..प्रत्येक वेळी एखादा विशिष्ट संगीत प्रकार हा त्या कथानकात असेल असं नव्हे, पण एकंदर पुस्तकाला संगीत वेढून असतं. मला वाटतं, की कुठलाही लेखक मनापासून लिहिताना संगीताला टाळू शकत नाही. आणि मग कधी कळत तर कधी नकळत संगीताचे संदर्भ त्याच्या लेखनात उतरतात.याबाबत मला नेहमी नित्झे आठवतो. अत्यंत तार्किक असा हा विचारवंत लेखक, पण त्याचं संगीताविषयी असलेलं एक विधान श्रद्धावान माणसाचं विधान वाटतं! तो म्हणतो, ‘‘Without music, life would be a mistake.’’ अर्थात याला मोजके आणि सन्माननीय अपवाद असतातच. Lolita ही जगप्रसिद्ध कादंबरी लिहिणारा व्लादिमीर नाबोकोव याच्या संगीतविषयक विधानानं खळबळ उडालेली होती.त्यानं त्याच्या Speak, Memory या आत्मकथनात संगीत म्हणजे तापदायक सुरांची अतर्क्य चढाओढ असते असं म्हटलं आहे! त्याचे मूळ शब्द ‘irritating sounds’ असेच आहेत! पण असं असलं तरी गंमत म्हणजे खुद्द Lolita या त्याच्या कादंबरीत अनेक सुंदर सांगीतिक संदर्भ आहेत.कधीकधी आपल्याला एखादा सांगीतिक संदर्भ इतर वाचकांपेक्षा अगदी पटकन कळतो. ई.एम. फॉर्स्टरच्या A Passage to India या कादंबरीचा तिसरा भागच मुळी तुकाराम महाराजांचं स्मरण करत येतो. ‘‘Tukaram, Tukaram, thou art my father, my mother, my everybody’’ असा नादघोष महूच्या राजवाड्यात होत असतो.हा संदर्भ अन्य कुणाहीपेक्षा मराठी वाचकाला पटकन आणि सहज कळणार, हे उघड आहे. या उलट ब्रिटिश वाचकाला हे वाचताना तुकाराम कोण हे गुगल करावं लागेल; इतकंच नव्हे तर एखादा मराठी अभंग यूट्यूबवर ऐकल्या-बघितल्याखेरीज त्याला या प्रसंगाची व्याप्तीच कळणार नाही. जगातल्या कुठल्याही लेखकाच्या आसपास त्याच्या संस्कृतीचं संगीत असतंच.ते त्याचा लेखनात कळत-नकळत उतरत जातं. आपण थोडं जागरूकपणे ते टिपलं, तर त्या वाचनाचा आनंद द्विगुणित होतो. याचसाठी पाश्चात्त्य जनसंगिताचे काही मूलभूत प्रवाह इंग्रजी साहित्य वाचण्याआधी माहीत असलेले बरे असतात. माझं स्वतःचं लयपश्चिमा हे पुस्तक कदाचित तुम्हाला ठाऊक असेल. ते वाचून ही पार्श्वभूमी तयार होऊ शकते.आणि नेटवरही अनेक संदर्भ आहेत. इंग्रजीत यावर अनेक पुस्तकं आहेत. तीही वाचाच, म्हणजे साहित्य आणि संगीत दोन्हींचा अभ्यास होऊन जाईल.ही बघा झुंपा लाहिरीच्या त्याच The Namesake कादंबरीची नायिका अशीमा. तिचा पती आता या जगात नाही. मुलं मोठी झाली आहेत. आता आपण काही काळ भारतात आणि काही काळ अमेरिकेत राहायचं आणि भारतात कोलकत्याला जाऊन आपल्या जन्मभर मागं राहिलेल्या संगीत शिकण्याच्या आवडीचा पाठपुरावा करायचा, असं ती ठरवते.झुंपासारख्या दुसऱ्या पिढीच्या स्थलांतरित लेखिकेलाही आपल्या कादंबरीचा शेवट भारतीय नायिका गंगेच्या किनारी भारतीय संगीत गाताना करावा वाटला हेही किती बोलकं! भारतीय संगीताची कॅसेट अजिबात न उघडता तशीच ठेवणारा गोगोल होता का खुद्द झुंपा?लेखक आणि लेखन यातले अनुबंध उलगडणारे हे सांगीतिक संदर्भ आणि त्यानं श्रीमंत होणारे आपण वाचक! साधं पुस्तक वाचायचं तरी केवढ्या गोष्टी आसपास असतात, नाही? आणि त्यातली एक गोष्ट चक्क गाण्याची असते हे आपण कायम लक्षात ठेवायचं असतं!अमीश त्रिपाठी यांच्या पुस्तकांमधील मेलूहा ही भूमी म्हटली तर काल्पनिक आणि म्हटली तर सिंधू भूमीच्या जवळ जाणारी. या सगळ्या मजा आपण नंतर बघणार आहोत. आजच्या लेखात सहज सांगीतिक संदर्भ बघूया. संगीत ही अद्भुत कला आहे. आणि साहित्यामध्ये अनेकदा संगीत कळत-नकळत उमटत असतं. शब्द आणि सूर यांची तशी ही मैत्री नेहमीच जोरात असते! (डॉ. आशुतोष जावडेकर लेखक, गायक, समीक्षक आणि इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आहेत.)----------------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.