प्रमोद बापटडेसमंड टूटू यांनी दक्षिण आफ्रिकेचं ‘रेनबो नेशन’ - वैविध्यपूर्णतेने नटलेला देश असं वर्णन केलं आहे, ते अगदी सार्थ आहे, हे प्रवासाअंती जाणवलं. भारताबाहेर प्रवास करायचा असेल, तर अवश्य या देशाची निवड करावी..कधी कधी एखादी गोष्ट करायची ठरवल्यावरही काहीतरी अडचण समोर येते आणि जमत नाही. दोन वर्षांपूर्वी मी आणि माझी पत्नी अमेरिकेत राहणाऱ्या मुलीकडे जाणार होतो, पण अखेरच्या क्षणी लक्षात आलं, की दीपाच्या, माझ्या बायकोच्या, व्हिसाची मुदत कोविडकाळातच संपली होती व नवीन व्हिसासाठी अनेक महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला भेट देण्याचं आमच्या स्वप्नात नसूनदेखील अचानक ठरलं.गेल्या वर्षी मे महिन्याच्या अखेरीस आम्ही दोघे पती-पत्नी, कविता-गिरिजा या लेकी, दोन्ही जावई आणि चौघी नाती अशा दहाजणांनी दक्षिण आफ्रिकेची १२ दिवसांची सहल केली. आकारानं भारताच्या एक तृतीयांश असणाऱ्या या देशात बघण्यासारखं बरंच काही आहे. त्या सर्व स्थळांना भेट द्यायची असेल, तर तीन ते चार आठवड्यांचा वेळ तरी हवाच. आमच्याकडे जेमतेम बारा दिवस होते. म्हणून आम्ही मोजकीच ठिकाणं निवडली. उत्तरेत क्रूगर नॅशनल पार्क व सन सिटी, दक्षिणेत आऊटशूर्न व नाइझ्ना ही ठिकाणं आणि अर्थातच केप टाऊन या जागांची निवड केली.आमची सफर दक्षिण आफ्रिकेतल्या सर्वात मोठ्या जोहान्सबर्ग शहरातून सुरू झाली. तिथे पोहोचताच एखाद्या फर्स्ट वर्ल्ड कंट्रीमध्ये असल्यासारखंच वाटत होतं. फक्त तिथल्याच नाही, तर त्या संपूर्ण देशातील रस्ते आणि सिग्नलिंग यंत्रणा कोणत्याही विकसित देशाच्या तोडीच्या आहेत. इंग्रजी इथल्या थोड्याच लोकांची मातृभाषा असली, तरी इथले बरेचसे व्यवहार याच भाषेतून होतात.तिथे पोहोचल्यावर आम्ही सर्वप्रथम हॉटेलपासून थोड्याच अंतरावर असलेल्या नेल्सन मंडेला स्क्वेअर या शॉपिंग सेंटरला भेट दिली. बाहेरच मंडेला यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आहे. हे शॉपिंग सेंटर खूपच मोठं आहे. त्यातच आम्ही रविवारी गेल्यामुळे मॉलमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती. या शॉपिंग सेंटरमध्ये असंख्य दुकानं, रेस्टॉरंट्स आहेत. .दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये नाश्ता करून आम्ही क्रूगर नॅशनल पार्कच्या दिशेनं कूच केलं. जवळपास ४०० किलोमीटरचं अंतर पार करायचं होतं. उत्तम रस्ते आणि थंडीचे दिवस असल्यामुळं प्रवासाचा शीण बिलकूल जाणवत नव्हता. क्रूगर नॅशनल पार्क आकारानं खूपच मोठं आहे. त्याचं क्षेत्रफळ जवळपास वीस हजार चौरस किलोमीटर इतकं आहे. त्याचा विस्तार दक्षिण आफ्रिकेच्या सीमेपलीकडील झिम्बाब्वे व मोझांबिक या देशांमध्येही झालेला आहे. इथं सुमारे दीडशे प्रकारचे सस्तन प्राणी, ५००हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती, विविध सरपटणारे प्राणी, हरतऱ्हेची वृक्षराजी आहे. आमच्या दोन सफारींमध्ये आम्ही मर्यादित भागच पाहू शकलो.पहाटेची सफारी आम्हाला विशेष भावली. त्या सफारीचा गाइड ‘स्मायली’ नावाप्रमाणंच हसतमुख होता. पार्कमधील मोठ्या प्राण्यांविषयी त्यानं विस्तृत माहिती दिली. या दोन्ही सफारींमध्ये आम्ही सिंह, हत्ती, जिराफ, झेब्रे, गेंडे, रानडुकरं, रानटी कुत्रे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहिले. सफारीहून परतल्यावर नाश्ता करताना आमच्यात पाहिलेले प्राणी-पक्षी आणि स्मायलीचीच चर्चा होती.नाश्ता आटपून आमच्या कॉटेजमध्ये परतलो तर वीज गायब झालेली. दक्षिण आफ्रिकेत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात विजेचा तुटवडा आहे. त्यामुळं संपूर्ण देशभर भारनियमन होत असतं. ते एकावेळी तीन तासांच्या आसपास, आणि दिवसातून तीन किंवा चार वेळा होतं. भारनियमनाच्या वेळा आधीपासूनच जाहीर केलेल्या असतात आणि त्या कसोशीनं पाळल्या जातात. काही ठिकाणी जनरेटरद्वारे मर्यादित प्रमाणात वीजपुरवठा करण्यात येतो, तर काही ठिकाणी मात्र टॉर्चचा वापर करून निभवून न्यावं लागतं.त्याच दिवशी रात्री जेवताना एक गमतीदार प्रसंग घडला. आम्ही दहाजण एका मोठ्या टेबलाभोवती बसून हसत खेळत भोजनाचा आनंद घेत होतो. थोड्या वेळानंतर, जवळच्याच एका टेबलावर बसलेली एक महिला हसत हसत आमच्याजवळ आली, तिनं आधी दीपाशी हस्तांदोलन केलं आणि नंतर चक्क मिठी मारून म्हणाली, ‘ओह, इट्स वंडरफुल टू सी सच अ हॅपी फॅमिली!’ किती छान वाटलं!!पुढच्या दिवशी सकाळी सन सिटीला जायला निघालो. वाटेत आम्ही एका खासगी ‘मिनी झू’ला भेट दिली. तिथं मार्गदर्शकाचं काम करणारा जॉन नावाचा अगदी पोरगेलासा तरुण होता. तिथं एका बंदिस्त क्षेत्रात १५-२० रानटी कुत्रे होते. जॉन हातानं खाद्यपदार्थांचे तुकडे हवेत उडवायचा. ते पकडण्यासाठी कुत्रे उंच उड्या मारत. सर्वाधिक चपळ व इतरांहून उंच उडी मारणाऱ्याला तो तुकडा मिळे. ही स्पर्धा होती, त्या तुकड्यांवरून कुत्र्यांमध्ये मारामारी वगैरे झाली नाही. तसंच तिथं ८-१० बिबटे होते. काही पूर्ण वाढ झालेले, तर काही बछडे होते. त्यांपैकी काहींना माणसाळवलेलं होतं. आमची सोळा वर्षांची नात नीरजा जॉनसोबत त्या बंदिस्त भागात गेली आणि आकारानं बऱ्यापैकी मोठ्या पिल्लाच्या अंगावरून हात फिरवण्याचा अनुभव घेतला!सन सिटीला पोहोचेपर्यंत सूर्यास्ताची वेळ झाली होती. प्रत्यक्षात हे शहर नसून आकारानं पुण्यातल्या एखाद्या पेठेपेक्षाही लहान आहे. एक विस्तीर्ण रिसॉर्ट म्हटलं तरी चालेल. रिसॉर्टमध्ये एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्यासाठी निःशुल्क शटल बससेवा आहे. या ‘सिटी’मध्ये अनेक प्रकारचे खेळ आणि अॅक्टिव्हिटीज आहेत. आमच्यापैकी काहीजणांनी तिथं क्वाड्रिसायकल - चार भलीमोठी चाकं असणारं वाहन चालवण्याचा थरार अनुभवला.सन सिटीहून जोहान्सबर्ग २०० किलोमीटर अंतरावर आहे. पियरमॉँट मेटकोर्ट अॅट एम्परर्स पॅलेस या भव्य कॉम्प्लेक्समधल्या हॉटेलमध्ये आमचा मुक्काम होता. आमच्या कॉम्प्लेक्समध्येच अगदी थोड्या अंतरावर एक कॅसिनो होता. तो माणसांनी फुलून गेला होता. ती आमच्या उत्तरेकडील भागाच्या सहलीची अखेरची रात्र होती.पुढच्या दिवशी सकाळच्या विमानानं आम्ही जॉर्ज या वेस्टर्न केप प्रांतातील शहरात पोहोचलो. तिथे आम्ही आऊटशूर्न भागात राहात होतो. या भागाला ‘ऑस्ट्रिच फार्म कॅपिटल’ म्हणून संबोधलं जातं. शहामृग पालन हा तिथला एक मोठा व्यवसाय आहे. तिथे शहामृग पालनाची साडेतिनशे नोंदणीकृत केंद्रं आहेत. एकेका फार्ममध्ये हजारो शहामृगं असतात. ऑस्ट्रिच फार्म बघायला गेलो तेव्हा आम्हाला १५-२० मिनिटांचा माहितीपट दाखवण्यात आला. त्यानंतर आम्ही प्रत्यक्ष फार्म पाहायला गेलो. इथं पूर्वी शहामृगांवर बसून फेरी मारता येई, मात्र आता त्यावर बंदी आहे. आमच्यापैकी काहीजणांनी शहामृगांना खाऊ घालण्याचा मजेशीर अनुभव घेतला. त्यांना खाऊ घालण्याची पद्धत एकदम रंजक आहे. त्यांच्याकडे पाठ करून उभं राहून हातात खाद्यपदार्थांचा वाडगा धरायचा, मग शहामृगं मागून येऊन, मान लांब करून त्याचा फडशा पाडतात.पुढे आम्ही ‘कँगो केव्ह्ज’ला भेट देणार होतो. कँगो केव्ह्जची टूर सव्वा तासाची होती. आमच्या वाटाड्यानं रंजक पद्धतीनं गुहेतल्या वेगवेगळ्या ठिकाणांची वैशिष्ट्यं समजावून सांगितली. स्टॅलॅक्टाइट (छतापासून खाली येणारे स्तंभ) व स्टॅलॅग्माइट (जमिनीपासून वर जाणारे स्तंभ) यांचे मोहून टाकणारे रंग आणि आकार आम्हाला पाहायला मिळाले.ट्रीपच्या पुढच्या टप्प्यात १८४०पासून अस्तित्त्वात असलेल्या बेल्विडेर मॅनोर या ऐतिहासिक ठिकाणी आम्ही दोन दिवस राहणार होतो. सकाळी उठल्यावर आमच्या रिसॉर्टच्या परिसरात फेरफटका मारला. तिथं आमची सरबराई करणारा वेटर फारच गमतीशीर होता. आम्ही भारतातून आलो आहेत हे ओळखून प्रत्येक खेपेस जवळ आल्यावर त्याच्या विशिष्ट उच्चारात, सुहास्य वदनानं ‘नामास्ते’ म्हणायचा. खाण्यावर भरपूर ताव मारून आम्ही बाहेर पडलो. तो दिवस साहसी खेळांचा होता. त्यात आमच्या चौघी नाती भाग घेणार होत्या!साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर आम्ही नाइझ्ना झिपलाइन्सला पोहोचलो. नाइझ्ना झिपलाइन्सच्या केबल्स जमिनीपासून २०० मीटर उंचीवर आहेत. त्यामुळे इतरांना झिपलाइनिंग करताना पाहूनच आमचा श्वास रोखून धरला जात होता. प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्यांचं काय होत असेल! पण आमच्या या पोरी बिनधास्त सहभाग घेत होत्या. झिपलाइनिंगनंतर जवळच असलेल्या ब्लोवर कार्न्स ब्रिज बंजी जम्पिंग या दक्षिण आफ्रिकेतल्या सर्वात उंचावरच्या बंजी जम्पिंगच्या स्पॉटलाही भेट दिली.एवढे दिवस आम्हाला साथ देणाऱ्या हवामानानं मात्र एव्हाना असहकार पुकारला होता. पुढच्या दिवशीची सकाळ ढगाळ हवा व रिपरिप पाऊस घेऊन आली. आम्ही लगून बीच हॉटेल ॲण्ड स्पा या आमच्या नियोजनातल्या अखेरच्या स्थानाकडे जायला निघालो. हे हॉटेल समुद्र किनाऱ्यावरच आहे. हे रिसॉर्ट आमच्या इतर राहण्याच्या ठिकाणांपेक्षा काकणभर सरसच होतं.दक्षिण आफ्रिकेत पर्यटनाला येणारा कोणीही केप टाऊनला भेट दिल्याशिवाय जात नाही. इथं दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे आम्हाला आमचे मूळ बेत बदलावे लागले. नवीन प्लॅननुसार आम्ही बौल्डर्स बीच इथं पेंग्विन दर्शनासाठी गेलो. अतिशय गोड दिसणाऱ्या या पक्ष्यांकडे कितीही वेळ पाहत राहिलं तरी कंटाळा येत नाही.पुढच्या दिवशी थोड्या उंचावर असणाऱ्या केप पॉइंटला गेलो. तिथून थोड्याच अंतरावर असणाऱ्या ‘केप ऑफ गुड होप’ या जगप्रसिद्ध ठिकाणाला भेट दिली. दक्षिण आफ्रिकेचं हे नैऋत्य टोक म्हणता येईल. समुद्राला लागून असलेला हा भाग फोटो काढण्यासाठी उत्तम आहे.बघता बघता आमच्या सहलीचा शेवटचा दिवस ‘उजाडला’. दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश लाभला. त्यादिवशी आमचं लक्ष्य होतं टेबल माऊंटन. इथं पायथ्यापासून शिखरापर्यंत जाण्यासाठी केबल कारची सोय आहे. रांगेत आमचा नंबर लागल्यावर काही मिनिटांतच आम्ही वर जाऊन पोहोचलो. तेथे गेल्यावर एकूण क्षेत्राचा मोठा विस्तार पाहून अचंबित झालो. खाली येईपर्यंत दुपार झाली होती. वेळ होता म्हणून तिथल्या कर्स्टनबॉश नॅशनल बोटॅनिकल गार्डनला भेट दिली. या अत्यंत विस्तीर्ण उद्यानाची रचना कल्पकपणे केली आहे. एक एक ‘थीम’ घेऊन वेगवेगळे विभाग केले आहेत. ते बघायला जवळजवळ साडेतीन तास लागले.शेकडो वर्षांपूर्वी केप टाऊनला वळसा घालून दर्यावर्दी मंडळी भारत आणि आग्नेय आशियाच्या शोधात आली आणि येत राहिली. त्यामुळे या ठिकाणाला एखाद्या ‘माईल स्टोन’प्रमाणे महत्त्व आहे. अशा ऐतिहासिक ठिकाणी जाण्याचं आणि हा निसर्गरम्य देश पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. डेसमंड टूटू यांनी या देशाचं ‘रेनबो नेशन’ - वैविध्यपूर्णतेने नटलेला देश असं वर्णन केलं आहे, ते अगदी सार्थ आहे, हे जाणवलं. भारताबाहेर प्रवास करायचा असेल तर अवश्य या देशाची निवड करावी.-------------------------------.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.