डॉ. वर्षा वर्तक
लहान मुलं किंवा बाळांसाठी स्पेशल फिजिओथेरपिस्ट असतो का? आणि अशा फिजिओथेरपिस्टची गरज कधी भासते?
लहान मुलांसाठी जसा वेगळा पेडिॲट्रिशिअन असतो, त्याचप्रमाणे बाळांच्या किंवा लहान मुलांच्या वयानुसार योग्य हालचाली होत आहेत का, किंवा त्या होत नसल्यास त्यात कशी सुधारणा करता येईल यासाठी पेडिॲट्रिक फिजिओथेरपिस्ट असतो. अनेकदा बाळ पुरेसं ॲक्टिव्ह नाही असं पालकांना असं वाटतं. ते दीड वर्षाचं झालं तरी बसत नाही, पालकांनी किती दिवस वाट पाहायची? असे प्रश्न समोर येतात.
अशा वेळी एखाद्या मुलाच्या हालचाली थोड्या कमी असण्यामागे काही कारणं असू शकतात, हे समजून घ्यायला हवं. प्रसूतीच्या वेळी काही त्रास झालेला असतो, किंवा एखादा आनुवंशिक दोष असतो.