योगेश थिटे
फंडिंगची तजवीज करणे हे स्टार्टअपच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. फंडिंगचे विविध टप्पे आणि उपलब्ध पर्याय समजून घेतले, तर स्टार्टअपसाठी फंडिंग मिळवणे सहज साध्य होईल.
स्टार्टअप हा व्यवसायाचा एक अनोखा प्रकार आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांना सुलभ उत्तरे शोधणे, हा स्टार्टअपचा मुख्य उद्देश! हे व्यवसाय पारंपरिक व्यवसायांप्रमाणे नसतात. स्टार्टअप्सचा तंत्रज्ञानावर अधिक भर असतो, आणि ती तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योग वाढवतात.
उदाहरणार्थ, एखादे स्टार्टअप अॅपद्वारे ऑर्डर्स घेऊ शकते, स्थानिक उत्पादनांचा स्रोत होऊ शकते आणि त्या उत्पादनांना उत्तम कार्यक्षमतेने वितरित करू शकते; अशा स्टार्टअपकडे व्यवसाय वृद्धीची उच्च क्षमताही असू शकते.