Career Option : 23
मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या घातक पर्यावरणीय बदलांशी सामना करण्यासाठी जैवतंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. कार्बन डायऑक्साइडची साठवणूक करणे, जैविक तेल शुद्धीकरण संयंत्रे, कृषी जैवतंत्रज्ञान, निकृष्ट जैवसाहित्य, नूतनीकरणीय ऊर्जा, घनकचरा व्यवस्थापन अशा उपायांद्वारे कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन घटवता येणे शक्य आहे.
यामुळे शाश्वत भविष्याला चालना मिळू शकेल. भारत सरकारने जैविक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी मोठी गुंतवणूकही केली आहे. या उपाययोजनांमुळे हरित आणि अधिक शाश्वत विकास प्रक्रियांना गती मिळू शकेल.