Sugarcane Juice Recipes: उसाच्या रसापासून खिचडी आणि कुल्फी ? जाणून घ्या भन्नाट रेसिपी

उसाच्या रसापासून खिचडी आणि कुल्फी ? जाणून घ्या भन्नाट रेसिपी
Sugercane juice recipes
Sugercane juice recipesesakal
Updated on

- वैशाली खाडिलकर

खिचडी

साहित्य

(२ व्यक्तींसाठी) एक कप बासमती तांदूळ, अर्धा कप मुगाची सालाची डाळ, प्रत्येकी २ कप उसाचा रस व पाणी, पाव कप साजूक तूप, काळा खजूर (बिया काढून, तुकडे करून), प्रत्येकी २ टेबलस्पून काजू व बदाम, अर्धा टीस्पून वेलची पूड, ३-४ दुधात खललेल्या केशर काड्या, कणभर मीठ.

कृती

डाळ मिनिटभर भाजून घ्यावी. डाळ व तांदूळ स्वच्छ धुऊन उसाचा रस, पाणी व कणभर मीठ घालून कुकरमध्ये शिजवावे. गॅसवर पॅनमध्ये तूप घालून तयार डाळ-भात, म्हणजेच खिचडी मंद आचेवर परतावी. त्यात वेलची पूड, केशर पाणी, काजू-बदाम घालून व्यवस्थित एकजीव करून वाफ आणावी. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून खावयास द्यावी.

Sugercane juice recipes
तळसंदे नजीक अज्ञातांनी ऊसाचा ट्रॅक्टर पेटविला चालकाने योग्य आग बुजविल्याने मोठे नुकसान टळले.

सूप

साहित्य

(४ व्यक्तींसाठी) चार कप उसाचा रस, ४ टीस्पून चिंचेचा कोळ, १ कप पाणी, अर्धा कप नारळ चव, अर्धा टीस्पून भाजलेले जिरे - २ सुक्या लाल मिरच्या - लहान आले तुकडा - २ मिरे - याचे वाटण, स्वादानुसार मीठ, फोडणीसाठी १ टीस्पून तूप, प्रत्येकी चिमूटभर जिरे व हिंग.

कृती

गॅसवर कढईत तूप घालून खमंग फोडणी करावी. उसाचा रस, पाणी, चिंचकोळ इत्यादी जिन्नस घालून ढवळावे. मंद आचेवर दोन मिनिटे उकळावे. सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून प्यावयास द्यावे.

कुल्फी

साहित्य

(एका व्यक्तीसाठी) एक कप उसाचा रस, पाव कप खवा, २ टेबलस्पून दूध पावडर, २ टीस्पून ग्लुकोज, ४ थेंब व्हॅनिला इसेन्स, पिस्ता-बदाम तुकडे आवडीप्रमाणे.

कृती

वरील सर्व जिन्नस मिक्सर जारमध्ये घेऊन मऊसर मिश्रण करावे. हे मिश्रण कुल्फी मोल्डमध्ये घालून फ्रीजरमध्ये आठ तास ठेवावे. आयत्या वेळी मोल्डमधून काढून कुल्फी सर्व्ह करावी.

Sugercane juice recipes
भोसरीत शिवभक्तांना मोफत ऊसाचा रस

खीर

साहित्य

(४ व्यक्तींसाठी) एक कप बासमती तांदूळ, १ कप दूध, दोन कप उसाचा रस, अर्धा कप गूळ पावडर, प्रत्येकी १ टेबलस्पून काजू, बदाम तुकडे व चारोळ्या, २ टेबलस्पून नारळ चव.

कृती

तांदूळ शिजवून घ्यावेत. गॅसवर पॅनमध्ये दूध तापवून भात घालावा. नंतर उसाचा रस व गूळ पावडर घालून ढवळावे. चांगली वाफ आल्यावर काजू, बदाम, चारोळ्या व नारळ चव घालून एकजीव करावे. मिनिटभराने गॅस बंद करावा. तयार खीर पुरीसोबत खावयास द्यावी.

Sugercane juice recipes
Sugarcane Juice : त्रासदायक ठरणाऱ्या गोळ्या बंद करा अन् ऊसाचा रस प्यायला सुरू करा, आहेत अनेक फायदे

उत्साहवर्धक पेय

साहित्य

(२ व्यक्तींसाठी) दोन कप उसाचा रस, अर्धा कप पिठीसाखर, १ टीस्पून आले रस, अर्धा टेबलस्पून लिंबू रस, पाव टीस्पून वेलची पूड.

कृती

मिक्सर जारमध्ये उसाचा रस, पिठीसाखर एकत्र करावी. त्यात आले रस, लिंबू रस व वेलची पूड घालावी. सर्व जिन्नस घेऊन फिरवावेत व बाऊलमध्ये काढून तासभर फ्रीजमध्ये ठेवावे. आयत्या वेळी ग्लासमध्ये ओतून प्यावयास द्यावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com