अभय दिवाणजी
चार साखर कारखाने, कुरनूर धरण, विकासासाठीचे विविध रस्ते, अक्कलकोटला मिळालेला तीर्थक्षेत्राचा दर्जा, त्यामुळे वाढलेली भाविकांची गर्दी, वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान समिती, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या सर्वांमुळे अक्कलकोटची महती सातासमुद्रापार गेली आहे. सोलापूरला आल्यावर पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर आणि अक्कलकोट अशा पीठांचे दर्शन घेऊन भाविक तृप्त मनाने परततात.