Marathi article about Monkeypox.
डॉ. अविनाश भोंडवे
कोरोना महासाथीच्या सुरुवातीला जगातील सर्व आरोग्ययंत्रणा आणि जनता बेसावध होती. त्यामुळे तो जगभरात वेगाने पसरला आणि त्यामध्ये असंख्य लोकांनी प्राण गमावले. परंतु सावधगिरी बाळगल्यास, आजाराबद्दल माहिती घेऊन सतर्क राहिल्यास, एम-पॉक्सची महासाथ आली, तरी आपण तिला समर्थपणे रोखू शकू, असा विश्वास वाटतो.
जानेवारी २०२०पासून सुरू झालेल्या कोरोनाच्या महासाथीला कोण विसरेल? जवळपास साडेतीन वर्षंे चाललेली ही वैश्विक साथ ५ मे २०२३ रोजी संपुष्टात आल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले. त्यानंतर केवळ एकाच वर्षात २३ जुलै २०२४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्स या आजाराची साथ कोरोनाप्रमाणेच वैश्विक स्तरावर पसरू शकेल असे सूचित करून जगातील सर्व देशांना सतर्कतेचा इशारा दिला.
२५ ऑगस्ट २०२४पर्यंत जगभरात एकंदरीत ६२ हजार रुग्ण या आजाराने बाधित झाले होते आणि त्यातील पाचशेहून अधिक रुग्ण दगावले आहेत. आफ्रिका खंडातील १३ देशांमध्ये या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.