सम्राट कदमतंत्रज्ञानातील प्रगतीमुळे गेमिंग अधिकाधिक वास्तववादी आणि आकर्षक होत असून, गेमिंग गॅजेट्समुळे या क्षेत्रात क्रांती घडवून आणली जात आहे. आभासी खेळ अधिक वास्तववादी आणि आकर्षक होण्यासाठी गॅजेट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. .भारतातील गेमिंग उद्योग झपाट्याने वाढत आहे. अंदाजे ४० कोटींहून अधिक गेमर्ससह भारत जगातील दुसरी सर्वात मोठी गेमिंग बाजारपेठ आहे. मोबाईल गेमिंग हा गेमिंगच्या दुनियेतला सर्वात लोकप्रिय गेमिंग प्रकार आहे. त्यानंतर येतात पर्सनल कॉम्प्युटर्स आणि कन्सोल गेमिंग. आत्ताच्या काळात गेमिंग हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिले नाही, तर तो एक व्यापक उद्योग ठरत आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे गेमिंग अधिकाधिक वास्तववादी आणि आकर्षक होत असून, गेमिंग गॅजेट्समुळे या क्षेत्रात क्रांती घडवून आणली जात आहे. आभासी खेळ अधिक वास्तववादी आणि आकर्षक होण्यासाठी गॅजेट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. गेमिंगचे नवतंत्रज्ञान विकसित होत असताना, गेमिंगचा अनुभव अधिकाधिक आश्चर्यकारक आणि मनोरंजक होणार आहे. भारतीय बाजारपेठेतही गेमिंग गॅजेट्सची मागणी सध्या वाढत आहे.आधुनिक गेमिंग गॅजेट्सगेमिंग कन्सोलः गेमिंग कन्सोल किंवा व्हिडिओ गेम कन्सोल हे एक संगणक उपकरण आहे. एक किंवा अधिक लोक खेळू शकतील असा व्हिडिओ गेम प्रदर्शित करण्यासाठी गेम कन्सोल व्हिडिओ सिग्नल किंवा व्हिज्युअल इमेज आउटपुट देते. सोप्या शब्दात सांगायचे तर टीव्ही किंवा डिस्प्ले युनिटवर विविध गेम खेळण्यासाठी वापरले जाणारे उपकरण म्हणजे गेमिंग कन्सोल. बाजारात सध्या प्लेस्टेशन-5, एक्सबॉक्स सिरीज एक्स/ एस, आणि निंटेंडो स्विचसारख्या नवीन पिढीच्या कन्सोलची चर्चा आहे. यात शक्तिशाली प्रोसेसर, ग्राफिक्स आणि स्टोरेज क्षमता असते; पर्यायाने गेम अधिक वास्तववादी होतात आणि वापरकर्त्याला इमर्सिव्ह गेमिंग अनुभव मिळतो..गेमिंग पीसीः गेमर्ससाठी सर्वात लवचिक आणि शक्तिशाली पर्याय म्हणजे गेमिंग पीसी. आपले संगणक उपकरण याच गेमिंग पीसीद्वारे कस्टमाईज केले जाते व त्यामुळे गेमिंगसाठी आवश्यक सर्व अपग्रेडेशन करत येते.गेमिंग लॅपटॉप: गेमिंग लॅपटॉपमुळे पोर्टेबिलिटी आणि कार्यक्षमतेचा उत्तम समतोल साधता येतो. हे लॅपटॉप नव्याने येणारे गेम्स खेळण्यासाठी पुरेसे शक्तिशाली आहेत, तरीही ते सहजपणे पोर्ट केले जाऊ शकतात.गेमिंग हेडसेट: गेमिंग हेडसेट उत्तम ऑडिओ अनुभव देतात आणि गेमर्सना इतर खेळाडूंशी संवाद साधण्यास मदत करतात. काही हेडसेटमध्ये थ्रीडी ऑडिओ आणि व्हर्चुअल सराऊंड साउंडसारख्या प्रगत प्रणालीदेखील असतात.गेमिंग चकरी आणि कीबोर्ड: गेमिंग चकरी आणि कीबोर्ड अधिक अचूकता आणि नियंत्रण देतात, ज्यामुळे गेमर्सना स्पर्धात्मक लाभ मिळतो. काही गेमिंग चकरी, कीबोर्डमध्ये प्रोग्रामेबल बटणे आणि आरजीबी लाइटिंगसारखी अतिरिक्त वैशिष्ट्येदेखील असतात..गेमिंग गॅजेट्सचे भविष्यतंत्रज्ञानात प्रगती होईल तशी गेमिंग गॅजेट्सही अधिकाधिक प्रगत होत राहतील. भविष्यात गेमिंगच्या दुनियेवर प्रभाव टाकू शकतील असे काही ट्रेंड्स आता दिसू लागले आहेत. त्यात मुख्यत्वे पुढील ट्रेंड्स सांगता येतील...क्लाऊड गेमिंगः संगणकीयदृष्ट्या अधिक क्षमतेचे गेम्स प्रत्येकवेळी डिव्हाईसवर डाऊनलोड करण्याची गरज नाही. त्यासाठी क्लाऊड गेमिंग हा उत्तम पर्याय आहे. क्लाऊडवर वापरकर्ते अधिक प्रगत गेमही खेळू शकतात.व्हर्चुअल आणि ऑगमेंटेड रिअॅलिटीः हे तंत्रज्ञान खेळाडूंना पूर्णपणे गेमच्या जगामध्ये गुंतवून ठेवते. व्हीआर हेडसेट्स आजूबाजूच्या वास्तविक जगाला पूर्णपणे ब्लॉक करतात आणि वापरकर्त्यांना पूर्णपणे व्हर्च्युअल वातावरणात घेऊन जातात. तर एआर हेडसेट्स आजूबाजूच्या वास्तविक जगावर डिजिटल माहिती प्रक्षेपित करतात. गेमिंग अधिकाधिक वास्तववादी आणि आकर्षक करण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावते. या तंत्रामुळे सध्या एआयआधारित गेमिंग अनुभव अधिक आकर्षक होत आहे.फाइव्हजी आणि गेमिंग: फाइव्हजी तंत्रज्ञान गेमिंगसाठी क्रांतिकारी ठरू शकते. फाइव्हजी अत्यंत जलद वेगामुळे क्लाऊड गेमिंग अधिक वेगवान आणि विश्वासार्ह होईल..ट्रेंडी गेमिंग गॅजेट्ससोनी प्ले स्टेशन व्हीआर-2: हे नवीन व्हर्च्युअल रिॲलिटी हेडसेट प्लेस्टेशन-फाइव्हसाठी आहे. यात आश्चर्यकारक ग्राफिक्स, सुधारित ट्रॅकिंग आणि नवीन नियंत्रक आहेत.मायक्रोसॉफ्ट एक्सबॉक्स सिरीज एक्स : हे शक्तिशाली गेमिंग कन्सोल २०२०मध्ये रिलीज झाले आणि ते 4K गेमिंग आणि 8K व्हिडिओ स्ट्रिमिंगसाठी सक्षम आहे. यात वेगवान एसएसडी आहे, ज्यामुळे लोडिंग जलद होते.व्हॉल्व्ह स्ट्रीम डेक: हा पोर्टेबल पीसी गेमिंग कन्सोल २०२२मध्ये रिलीज झाला. यात शक्तिशाली एएमडी प्रोसेसर आणि ग्राफिक्स कार्ड आहे. यात सात इंचांचा टचस्क्रीन डिस्प्ले आणि नियंत्रकांसह पीसी गेम्स खेळण्याची क्षमता आहे.रेझर किशी व्ही-2: हा मोबाईल गेमिंग कंट्रोलर २०२२मध्ये रिलीज झाला. आयफोन आणि अँड्रॉइड डिव्हाईससाठी योग्य आहे. यात आरामदायी एर्गोनॉमिक डिझाईन आणि अनेक बटणे आहेत जी वापरकर्त्यांना त्यांच्या आवडत्या मोबाईल गेम्सचे अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यास उपयोगी पडतात.(सम्राट कदम दै. सकाळच्या पुणे आवृत्तीचे विज्ञान वार्ताहर आहेत.)------------------------.Marathi Book Review : ‘माय लाईफ इन फुल’ असामान्य महिलेचा प्रेरणादायी प्रवास.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.