डॉ. प्रमोद जोग
‘मुलांशी अमुक प्रकारे वागायला हवे’, ‘त्यांच्याशी शांतपणे चर्चा करावी’, ‘त्यांना समजून घ्यावे’ अशा प्रकारचे सल्ले किशोरांच्या पालकांना दिले जातात. हे जरी पटले तरी ते नक्की कसे प्रत्यक्षात आणायचे, हे कसे समजणार? प्रिय पालक या पुस्तकात डॉ. वैशाली देशमुख यांनी असे नुसते सल्ले देणे टाळले आहे. भरपूर उदाहरणांसह किशोरवयीन मुलांबाबत सातत्याने घडणारे प्रसंग प्रत्यक्ष संभाषणांच्या स्वरूपात इथे आपल्यासमोर येतात.