Teenage Parenting : किशोरवयीन मुलांना तंत्रज्ञान, समाजमाध्यमं आणि त्यांचे धोके याविषयी बऱ्यापैकी माहिती; अभ्यासातून बाब समोर

आपण अतिवापर करतोय याची त्यांना जाणीवच होत नाही. त्यांनाच काय, आपल्या सगळ्यांनाच ही भूल पडते
Teenage Parenting
Teenage ParentingEsakal
Updated on

डॉ. वैशाली देशमुख

आपण अतिवापर करतोय याची त्यांना जाणीवच होत नाही. त्यांनाच काय, आपल्या सगळ्यांनाच ही भूल पडते. ‘मी फक्त पाचच मिनिटं सर्फ केलं,’ असं म्हणताना ती पाच मिनिटं नसून चाळीस मिनिटं होती याची मुळात जाणीवच होत नाही. हे भान आलं तर त्यावर उपाय शोधण्याची गरज भासेल. आणि गरज भासेल तेव्हाच त्यावर कृती केली जाईल.

माध्यमांचा अतिवापर होतोय, तो कमी करायला हवा हे कळतं पण वळत नाही. तो पूर्ण बंद केला तर फोमो (FOMO - fear of missing out) वाटतो. कमी करायचा तर कसा, त्याचे वास्तववादी मार्ग कोणते हे समजत नाही. आईबाबांनी सुचवलेले मार्ग अतिरेकी, अशक्य वाटतात; पटत नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.