डॉ. अविनाश भोंडवे मानसिक विकार असलेल्या किशोरवयीन मुलांच्या गरजा पूर्ण करणे महत्त्वाचे ठरते. किशोरवयीन मुलांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी शासकीय पातळीवरदेखील अनेक धोरणे, नवनवे कार्यक्रम आणि उपयुक्त साधने यावर कार्य करणे आवश्यक आहे..जगातील लोकसंख्येत दर सहापैकी एक व्यक्ती १० ते १९ वर्षे वयोगटातली, म्हणजे किशोरवयीन आहे. आयुष्यातला हा पौगंडावस्थेचा काळ अनोखा, सर्जनशील आणि व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणणारा असतो. जीवनातल्या या टप्प्यात शारीरिक, भावनिक आणि सामाजिक बदल घडत असतात. पण त्यांना गरिबी, अत्याचार किंवा हिंसाचाराची पार्श्वभूमी असेल, तर या किशोरवयात अनेक मानसिक आरोग्यसमस्या उद्भवू शकतात.पौगंडावस्थेतील मुलांचे प्रतिकूल परिस्थितीमध्ये संरक्षण करणे, त्यांच्या सामाजिक जाणिवा जोपासणे, भावनिक शिक्षणाचा पाया रचणे, मनोवैज्ञानिक कल्याणास प्रोत्साहन देणे आणि मानसिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हे समाजाचे कर्तव्य असते. पौगंडावस्था पार करून तारुण्यात प्रवेश करणाऱ्या किशोरांच्या सर्वांगीण स्वास्थ्याची जाणीव प्रत्येक सुजाण नागरिकाला असायला हवी.जागतिक आकडेवारीनुसार १० ते १९ वयातील एकूण मुलांमुलींपैकी १४ टक्क्यांना मानसिक आरोग्याविषयी समस्या असतात. पण त्यातल्या बहुतेकांना, आपल्याला काही मानसिक समस्या आहेत याचीच जाणीव नसते. साहजिकच ते उपचारांपासून वंचित राहतात.किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक विकार उद्भवण्याच्या कारणांमध्ये, सामाजिक बहिष्कार, भेदभाव, सामाजिक कलंक, मानसोपचार घेण्याबाबत असलेले गैरसमज, शैक्षणिक अडचणी, जोखीम स्वीकारण्याची प्रवृत्ती, शारीरिक अस्वास्थ्य आणि मानवी हक्कांचे उल्लंघन हे घटक कारणीभूत असतात.चांगल्या मानसिक आरोग्याचे निकषयोग्य पद्धतीच्या शारीरिक, सामाजिक आणि भावनिक सवयी विकसित करणे, हा मानसिक आरोग्याचा पाया असतो. या सवयी विकसित होऊन आत्मसात करण्यासाठी किशोरावस्था हा महत्त्वाचा काळ असतो. यात -रोजच्या रोज योग्य वेळी आणि योग्य काळ झोप घेणे,नियमित व्यायाम करणे,त्रासदायक परिस्थितींना योग्य पद्धतीने सामोरे जाणे,स्वतःला असलेल्या समस्या जाणून, त्या दूर करण्याचे योग्य उपाय समजून घेणे,समाज, मित्रमैत्रिणी यांच्याशी परस्परसंबंध वाढवण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये विकसित करणे,अतिरेकी भावना नियंत्रित करण्यास शिकणे यांचा समावेश असतो.त्यासाठी कुटुंबात, शाळेत आणि समाजामध्ये किशोरांसाठी संरक्षणात्मक आणि आश्वासक वातावरण असणे आवश्यक असते.किशोरांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय पातळीवरील प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागणे, समवयस्कांशी जुळवून घेण्याचा दबाव असणे, आपली स्वतःची ओळख शोधणे या घटकांचा समावेश असतो. प्रसारमाध्यमांमुळे आणि लैंगिक असमानतेमुळे, जगत असलेले वास्तव आणि त्यांची भविष्याबाबतची स्वप्ने, समजुती, कल्पना, आकांक्षा यातला विरोधाभास त्यांना जाणवू लागतो. त्यांच्या कौटुंबिक जीवनाचा दर्जा आणि समवयस्कांशी असलेले नाते याचाही त्यांच्यावर परिणाम होत असतो. हिंसा, लैंगिक अत्याचार, गुंडगिरी, कठोर पालकत्व आणि सामाजिक तसेच आर्थिक समस्या यांचेही त्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. वेगवेगळ्या समस्यांमध्ये अडकलेल्या समाजातील किशोरवयीन मुलांना; त्यांच्या राहणीमानाचा दर्जा, सामाजिक कलंक, भेदभाव, सामाजिक बहिष्कार, समस्या सोडवणाऱ्या सेवांचा अभाव किंवा त्या असल्यास त्यांचा लाभ घेण्याबाबतची बंधने अथवा मज्जाव असणे, यांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो..असेच प्रश्न काही दीर्घकालीन शारीरिक आजार, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर, बौद्धिक अपंगत्व, तसेच शारीरिक अथवा मानसिक अपंगत्व निर्माण करणाऱ्या मज्जासंस्थेच्या आजारांनी पीडित मुलांमध्ये हमखास आढळतात. याशिवाय किशोरवयातील गर्भधारणा, किशोरवयीन मातृत्व/ पितृत्व, वयात येण्यापूर्वी किंवा सक्तीने विवाह घडवून आणलेली किशोरवयीन जोडपी, अनाथ, अल्पसंख्याक, वांशिक किंवा लैंगिक पार्श्वभूमीमुळे बहिष्कार घातलेल्या गटातील किशोरवयीन मुलामुलींमध्ये मानसिक समस्या मोठ्या प्रमाणात आढळतात.भावनिक विकार ः सर्वसामान्यपणे किशोरवयीन मुलांमध्ये भावनिक विकार आढळतातच. यात चिंता विकार म्हणजे किरकोळ गोष्टींना अकारण घाबरणे किंवा त्याबाबत जास्त काळजी करणे हा प्रकार सर्वात जास्त आढळतो. याची वर्गवारी पाहिली, तर १० ते १४ वर्षे वयोगटातील ३.६ टक्के, १५ ते १९ वर्षे वयोगटातील ४.६ टक्के किशोरांमध्ये चिंता विकार आढळतो.नैराश्य ः हा आणखी एक सर्वसामान्यपणे आढळणारा विकार. याच्या लक्षणांमध्ये, झोप नीट न लागणे, अपराधीपणाची अवास्तव जाणीव असणे, अभ्यासातील एकाग्रता कमी होणे, भूक मंदावणे, सतत दमल्यासारखे वाटणे, खचल्यासारखी मानसिक स्थिती होणे, आवडत्या अॅक्टिव्हिटीजमधील रस कमी होणे, स्वभाव चिडचिडा होणे आणि आत्महत्येचे विचार मनात येऊ लागणे यांचा समावेश होतो.१० ते १४ वर्षे वयोगटातील १.१ टक्का, १५ ते १९ वर्षे वयोगटातील २.८ टक्के किशोरवयीन मुलांमध्ये नैराश्य आढळते. चिंता आणि नैराश्यामुळे ही मुले शाळेत जाणे टाळू लागतात, त्यांची शाळेतील उपस्थिती कमी भरते आणि त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर दीर्घकालीन परिणाम होतात. त्यातूनच समाजापासून दूर राहणे, एकाकी राहणे या सवयी निर्माण होऊन नैराश्य वाढते.वर्तन विकार ः १० ते १९ वयोगटामध्ये काही प्रकारचे आजार मोठ्या प्रमाणात आढळतात. यात अटेन्शन डेफिसिट हायपर-अॅक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) ही समस्या सध्या अनेक मुलांमध्ये दिसू लागली आहे. या विकारामध्ये, वर्गातील शिकवण्याकडे किंवा कुणी काही सांगत असेल, तर त्याकडे ही मुले लक्ष देत नाहीत. इतर क्रियाकल्पांमध्ये ती जास्त गुंगून जातात.एखादी कृती केल्यास, तिचे काय परिणाम होतील, याचा विचार करत नाहीत. या वर्तन विकारामध्ये शिस्त टाळण्याची, विध्वंसक किंवा आक्रमक वर्तनाची लक्षणे दिसतात. वर्तणुकीशी संबंधित अशा विकारांमुळे शिक्षणावर परिणाम तर होतोच, पण गुन्हेगारी वर्तनही घडू शकते. १० ते १४ वयोगटातल्या ३.६ टक्के मुलांमध्ये, तर १५ ते १९ वर्षाची गटातील मुलांमध्ये २.४ टक्के मुलांमध्ये हा प्रकार दिसून येतो. हा विकार १० ते १४ वर्षांच्या ३.१ टक्के मुलांमध्ये तर १५ ते १९ वर्षाच्या गटातल्या २.४ टक्के मुलांत आढळतो.खाण्याचे विकार ः अॅनोरेक्सिया नर्वोसा, म्हणजे खाण्यापिण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे, दिवस दिवस काहीही न खाणे आणि बुलिमिया नर्वोसा, म्हणजे सतत काहीतरी चरत राहणे, खाण्याचे हे विकार, पौगंडावस्थेत आणि तारुण्यात उद्भवतात. या विकारांमागे बरेचदा आपण खूप जाड आहोत किंवा खूप बारीक आहोत असे नकारात्मक विचार असतात. अॅनोरेक्सिया नर्वोसामध्ये होणाऱ्या शारीरिक दुष्परिणामांमुळे अकाली मृत्यू होऊ शकतो. किंवा आत्महत्येसही प्रवृत्त होतात. इतर कोणत्याही मानसिक विकारांपेक्षा या आजारात मृत्यूच्या घटना जास्त घडतात.मनोविकार ः मनोविकारांची लक्षणे आणि मनोविकार साधारणपणे पौगंडावस्थेच्या उत्तरार्धात किंवा तारुण्याच्या सुरुवातीच्या काळात जास्त प्रमाणात उद््भवतात. या लक्षणांमध्ये-हॅल्युसिनेशन्स ः हॅल्युसिनेशन्स म्हणजे विभ्रम किंवा मतिभ्रम. यात त्या व्यक्तीला प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या गोष्टी जाणवतात. प्रत्यक्ष नसलेल्या गोष्टी दिसणे, ऐकू येणे, अनुभवणे, वास येणे किंवा चव चाखणे अशी याची लक्षणे असतात. स्किझोफ्रेनिया, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स अशा मानसिक विकारांमध्ये आणि अमली पदार्थांचा वापर किंवा कमालीचा थकवा अशा शारीरिक स्थितींमध्ये मतिभ्रम होतो.डिल्युजन्स- डिल्युजन्स किंवा भ्रम, म्हणजे ठामपणे मानलेला खोटा विश्वास असतो. एखादी गोष्ट चुकीची आहे असे स्पष्ट पुरावे असूनही तो भ्रम टिकून राहतो. स्किझोफ्रेनिया, भ्रामक विकार आणि बायपोलर डिसऑर्डर अशा मनोविकारात हे लक्षण आढळते. या विकारांमुळे त्या मुलांच्या पौगंडावस्थेतील दैनंदिन जीवनात आणि शैक्षणिक आयुष्यात उलथापालथ होते. यातून शिक्षण सोडून देणे, लांच्छनास्पद वर्तन करणे, मानवी हक्कांचे उल्लंघन करणे अशा घटना घडतात.आत्महत्या आणि स्व-दुखापतआत्महत्या हे १५ ते १९ वयाच्या किशोरांमध्ये होणाऱ्या मृत्यूचे चौथे प्रमुख कारण असते. आत्महत्येबाबत जोखमीच्या अनेक बाबी या वयात निर्माण होतात. यामध्ये अतिरिक्त मद्यसेवन, बालपणात त्यांच्यावर झालेले लैंगिक अत्याचार, आपल्या आजाराबाबत मदत मागण्याविषयी असलेल्या गैरसमजुती, किंवा तशी मदत मिळण्यात येणारे अडथळे आणि आत्महत्या करण्यासाठी लागणारी साधने सहजगत्या मिळणे यांचा समावेश होतो. डिजिटल मीडियाच्या आणि इतर सामाजिक प्रसार माध्यमांच्या विपुलतेचा परिणामदेखील किशोरवयातील आत्महत्येच्या आणि स्व-दुखापतीच्या वाढत्या संख्येत दिसून येतात.अतिरिक्त जोखीमतंबाखूजन्य पदार्थ, मद्यसेवन, नशेच्या पदार्थांची व्यसने, असुरक्षित लैंगिक संबंध अशा अनेक गोष्टींची सुरुवात पौगंडावस्थेत होते. अतिरिक्त जोखीम आचरणे, हे खरेतर भावनिक अडचणींना सामोरे जाण्यासाठी असलेले एक चुकीचे धोरण असते. या सर्वांचा किशोरवयीन मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो. जगभरातल्या आकडेवारीनुसार, १५ ते १९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांमधील अतिरिक्त मद्यपानाचे प्रमाण २०१६मध्ये १३.६ टक्के होते. त्यात मुलांची संख्या मुलींपेक्षा जास्त होती. तंबाखूसेवन, धूम्रपान आणि गांजाचा वापर किशोरवयीन मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. प्रौढांच्या जागतिक पातळीवरील सर्वेक्षणात, ५० टक्क्यांहून अधिक व्यक्तींनी वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच पहिल्यांदा धूम्रपान केल्याचे नमूद केले आहे. १५ ते १६ वर्षे या वयोगटात ४.७ टक्के मुले हशीशचा वापर करतात असे आढळून आले आहे. हिंसाचार करण्यालाही जोखीमीचे वर्तन मानले जाते. यामुळे शिक्षणात मागे पडण्याची, दुखापती होण्याची, गुन्ह्यांमध्ये सहभागी होण्याची, किंवा मृत्यू पावण्याची मोठी शक्यता असते. २०१९मध्ये १५ ते १९ वयाच्या किशोरवयीन मुलांच्या मृत्यूच्या प्रमुख कारणांमध्ये वैयक्तिक हिंसाचार वरच्या क्रमांकावर होता..प्रतिबंधमानसिक समस्या नियंत्रित करण्यासाठी मानसिक आरोग्याबाबत जागृती करणे आणि मानसिक विकार निर्माण होण्यास प्रतिबंध करणे हेच मुख्य धोरण असणे गरजेचे आहे. त्यासाठी-भावना नियंत्रण करण्याची क्षमता वाढवणे,मानसिक समस्या सोडवण्यासाठी जोखमीचा पर्याय पत्करण्याऐवजी अन्य पर्याय उपलब्ध करणे,अवघड आणि प्रतिकूल परिस्थिती हाताळण्यासाठी मानसिक लवचिकता निर्माण करणे,मुलांना समर्थन देणारे सामाजिक वातावरण आणि सामाजिक नेटवर्कला प्रोत्साहन देणे,या गोष्टी अमलात आणणे आवश्यक असते.या गोष्टी डिजिटल मीडिया, आरोग्यसेवा, सामाजिक संस्था, शाळा-कॉलेजेस आणि एकूणच सर्व समाजामार्फत राबवणे आवश्यक आहे. किशोरवयीन मुलांपर्यंत, विशेषतः असुरक्षित गटातील मुलांपर्यंत प्रतिबंधक उपाय पोहोचण्यासाठी विविध धोरणे, आणि बहुस्तरीय दृष्टिकोन आवश्यक आहे.मानसिक विकार असलेल्या किशोरवयीन मुलांच्या गरजा पूर्ण करणे महत्त्वाचे ठरते. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करणे, जास्त प्रमाणात औषधे देणे, औषधांव्यतिरिक्त समुपदेशन, मेडिटेशन, योगा, शारीरिक व्यायाम, विशेष छंद जोपासणे अशा अन्य गोष्टींना प्राधान्य देणे आवश्यक आहे. युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द चाइल्ड, तसेच इतर मानवाधिकार नियमांनुसार मुलांच्या मानवी हक्कांचा आदर करणे हे किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.किशोरवयीन मुलांच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी शासकीय पातळीवरदेखील अनेक धोरणे, नवनवे कार्यक्रम आणि उपयुक्त साधने यावर कार्य करणे आवश्यक आहे.जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या ‘हेल्पिंग अॅडोलेसंट्स थ्राईव्ह’ या इनिशिएटिव्हद्वारे किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी आखलेल्या धोरणांचा आणि प्रकल्पांचा पाठपुरावा सर्व पातळ्यांवर व्हायला हवा. या प्रकल्पांमध्ये, मानसिक आरोग्याला चालना देण्याचे आणि मानसिक विकारांचा प्रतिबंध करण्याचे उपाय सुचवलेले आहेत.जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेल्या मेंटल हेल्थ गॅप ॲक्शन प्रोग्रॅम (एमएच-जीएपी) इंटरव्हेन्शन गाइड २.०मध्ये बाल आणि किशोरवयीन मुलांच्या मानसिकतेविषयी आणि वर्तणुकीशी संबंधित एक मॉड्युल विकसित केले आहे. मनोविकार तज्ज्ञ उपलब्ध नसतील अशा ग्रामीण आणि दुर्गम ठिकाणी असलेल्या उपचार केंद्रांसाठी मार्गदर्शक तत्त्वे, मुलांच्या मानसिक आरोग्य विकाराच्या पातळीचे मूल्यांकन आणि नियोजन करण्यासाठी पुरावे-आधारित क्लिनिकल प्रोटोकॉल त्यामध्ये समाविष्ट आहेत. याशिवाय पौगंडावस्थेतील भावनिक विकार आणि किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यसेवांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि सोपे उपचार विकसित करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना विशेष संशोधन करत आहे.(डॉ. अविनाश भोंडवे इंडियन मेडिकल असोसिएशन कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्स राष्ट्रीय शाखेचे माजी डीन आहेत.)-------------------------