रूपा देवधर
बाबांच्या चित्रामागचा विचार पाहताना दिसते ती त्यांची जबरदस्त निरीक्षणशक्ती, त्या निरीक्षणातून पकडलेलं नेमकं मर्म, त्यातली विसंगती आणि ती विनोदाच्या भाषेतून मांडण्याचं सामर्थ्य! यातून त्यांनी स्वतःची समृद्ध चित्रभाषा निर्माण केली आहे! ही गोष्ट कधी नुसतीच गंमत असते, कधी दांभिकतेवर बोट ठेवलेलं असतं, तर कधी सामाजिक वास्तव त्यातून पुढे येतं.