साधारण वर्षभरापूर्वी सॅम आल्टमन जगभरातल्या माध्यमांच्या पहिल्या पानावर होता. आता तुमच्याआमच्या हातात आलेल्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स -एआय टूल्सचा झपाटा वाढवणाऱ्या ओपन एआयचा आल्टमन सहसंस्थापक आणि मुख्य कारभारीही.
ओपन एआयच्या चॅटजीपीटीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगात घडवलेल्या उलथापालथी, आणि आल्टमन ओपन एआयमध्येच असण्यावरून झालेली सुदोपसुंदी वगैरे अशी सहजी विस्मरणात जाण्यासारखी नाही.