निरंजन घाटे
मी अनेक विषयांवर लिहीत आलो, याचं कारण माझं वाचनाचं व्यसन. वाचनात विषयाला बंधन नव्हतं आणि नाहीही. मी शिकत होतो तेव्हा इंग्रजी हा विषय आठवीपासून शिकवला जात असे. वडील गेल्यावर आम्ही काकांच्या मदतीवर शिकलो, शिवाय माझ्या वडिलांना भाऊ मानणाऱ्या बाळकाका कान्हेरे यांच्यामुळे. पुढे आईच्या प्रकृतीला मुंबई मानवत नसल्याने आम्ही पुण्याला आलो.