श्याम सोनुने, लोणार, जि. बुलढाणादाक्षिणात्य वास्तुशैलीचा उत्तम नमुना म्हणून लोणारच्या दैत्यसुदन मंदिराकडे पाहिले जाते..लोणारचे दैत्यसुदन मंदिर नवव्या शतकातील चालुक्यकालीन मंदिर आहे. दाक्षिणात्य शैलीतील पश्चिम विदर्भातील सर्वात सुंदर मंदिर म्हणून त्याची ओळख आहे. कोणार्क व खजुराहो या दोन मंदिरांच्या स्थापत्यशैलीच्या आधारे या मंदिराची रचना केली आहे. मंदिरात भगवान विष्णूंची मूर्ती स्थापित आहे. लोणारच्या पौराणिक कथांच्या आधारे, भगवान विष्णूने लोणारला लवणासूर नावाच्या राक्षसाचा वध केला व त्या राक्षसाच्या नावावरून या गावाला लोणार नाव मिळाले. लवण या संस्कृत शब्दाचा मराठी अर्थ मीठ असा आहे. लोणार सरोवराच्या पाण्याची क्षारता अधिक असल्याने त्याची चव खारट आहे..लवणासुराचा वध केल्यानंतर त्याच्या पोटावर पाय ठेवलेली भगवान विष्णूची रेखीव मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. लोणार हे ठिकाण छत्रपती संभाजीनगरहून १७५ किलोमीटर अंतरावर आहे. समृद्धी महामार्गाने मेहकरपर्यंत येऊन लोणारला जाता येते. नागपूर ते लोणार अंतर तीनशे किलोमीटर आहे. निवासासाठी एमटीडीसी व खासगी हॉटेल्स उपलब्ध आहेत. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, बुलढाणा येथून थेट बससेवा आहे..या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या मंदिरात वास्तुशास्त्र आणि खगोलशास्त्र या दोघांची सांगड असलेला किरणोत्सव पाहायला मिळतो. हा किरणोत्सव जवळपास पाच दिवस चालतो. किरणोत्सव साधारणतः फक्त दहा मिनिटांचा असल्यामुळे त्या वेळेत मंदिरामध्ये खूप गर्दी होते.(श्याम सोनुने दै. सकाळचे बातमीदार आहेत.)