कुशल हेंद्रे
हल्ली पर्यावरणपूरक ठिकाणं अधिकाधिक प्रवाशांना आकर्षित करत आहेत. कारण आता कार्बन फूटप्रिंटबद्दल जागरूकता वाढत आहे. प्रदूषणयुक्त शहरी जीवनातून प्रदूषणमुक्त पर्याय शोधणाऱ्यांसाठी कृषी पर्यटन उत्तम पर्याय आहे.
सन २०२०मध्ये पर्यटन उद्योगविश्वात एक मोठा बदल झाला. त्याचं कारण होतं कोविड. लॉकडाउनमुळे बंद झालेल्या आंतरराष्ट्रीय सीमा आणि कठोर नियमांमुळे प्रवास जवळजवळ पूर्णपणे थांबला होता. यामुळे जागतिक पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला.
या नवीन परिस्थितीला कसं तोंड द्यावं याचा विचार होत असताना पर्यटन उद्योगाला पुनर्जीवित करण्यासाठी एक पर्याय समोर आला, तो म्हणजे ‘अॅग्रो टुरिझम’ किंवा कृषी पर्यटन.