अक्षय खिरीड
कोणतीही परकीय भाषा शिकणं फारसं अवघड नसतं. परकीय भाषा शिकताना तुमचे दहावी-बारावीचे टक्के किती आहेत हेही महत्त्वाचं नसतं. या भाषा शिकण्याला वयाचं बंधनही नसतं. पण एक गोष्ट मात्र आवश्यक असते, ती म्हणजे इच्छाशक्ती. एखादी भाषा शिकण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्तीची गरज असते. या इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही भाषा क्षेत्रात करिअर करू शकता.