भारताच्या आसाम राज्यात वसलेल्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील एकशिंगी गेंडा. शिवाय अनेक दुर्मीळ पक्ष्यांसाठीही काझीरंगा प्रसिद्ध आहे. सुमारे ४३० एकरांच्या परिसरात वसलेल्या या अभयारण्यामध्ये एकशिंगी गेंड्यांची जगातली सगळ्यात जास्त संख्या आहे.
ब्रह्मपुत्रा नदीच्या सान्निध्यात वसलेल्या या अभयारण्यामध्ये रानगवे, हत्ती, पाणमांजरे, अस्वले, बारशिंगे असे इतरही प्राणी आढळतात. इथल्या जैवविविधतेमुळेच काझीरंगाचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीतही केला गेला आहे. काझीरंगा पार्क दरवर्षी १ मे ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पर्यटकांसाठी बंद असते. त्यामुळे नोव्हेंबर ते एप्रिल हा काळ काझीरंगा नॅशनल पार्कला भेट देण्यासाठी उत्तम आहे.
जवळचे विमानतळ : जोरहाट, ११५ किलोमीटर (अंदाजे)
जवळचे रेल्वे स्टेशन : फर्केटिंग जंक्शन, १०० किलोमीटर (अंदाजे)
भेट देण्याची सर्वोत्तम वेळ : नोव्हेंबर-एप्रिल