सुजाता नेरुरकर
वाढप: ४ व्यक्तींसाठी
साहित्य:
दोन कप तांदळाचे पीठ, २ कप ओला नारळ खोवून, अर्धा कप गूळ किसून, १ टीस्पून वेलची पूड, १ टेबलस्पून तूप, तेल.
कृती:
सारणासाठी: पॅनमध्ये १ टेबलस्पून तूप गरम करून घ्यावे. त्यामध्ये ओला नारळ व गूळ घालून २ ते ३ मिनिटे गरम करावे. मिश्रण थोडे कोरडे झाले, की त्यामध्ये वेलची पूड घालून मिश्रण थंड होऊ द्यावे.
आवरणासाठी : एका जाड बुडाच्या भांड्यात २ कप पाणी गरम करावे. त्यामध्ये तूप व मीठ घालून उकळी आणावी. नंतर त्यात तांदळाचे पीठ घालून लगेच मिक्स करून घ्यावे. झाकण ठेवून एक वाफ आली, की विस्तव बंद करावा. नंतर उकड एका प्लेटमध्ये काढून घ्यावी. थोडी थंड झाली की, पाण्याचा हात लावून चांगली मळून घ्यावी. पातोळ्या हळदीच्या पानात करतात. हळदीची पाने स्वच्छ धुऊन त्याचे ३ इंच x ३ इंच आकाराचे तुकडे कापून घ्यावेत.
तांदळाच्या उकडीचा एक मध्यम आकाराचा गोळा घेऊन हाताने हळदीच्या पानावर गोल आकारात थापावा. थापताना बोटाला थोडेसे तेल लावावे. त्यावर १ टेबलस्पून सारण ठेवून करंजीसारखी मुडपावे. मुडपताना पानासकट मुडपावे. अशा प्रकारे सर्व पातोळ्या करून चाळणीवर ठेवाव्यात आणि १० ते १५ मिनिटे वाफवून घ्याव्यात. नंतर हळदीचे पान काढून गरम गरम पातोळ्यांवर वरून तूप घालून सर्व्ह करावे.
वाढप: ४ व्यक्तींसाठी
साहित्य:
एक कप बारीक रवा, पाव कप गव्हाचे पीठ, १ कप गूळ, पाव कप सुके खोबरे (किसून, भाजून), १ टेबलस्पून तूप, २ टेबलस्पून तेल, १ टीस्पून वेलची पूड, पाव टीस्पून हळद, मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तीळ, १ टेबलस्पून खसखस, पाव टीस्पून बेकिंग पावडर.
कृती:
तीळ व खसखस मंद विस्तवावर वेगवेगळे भाजून बाजूला ठेवावे. त्याच कढईमध्ये गव्हाचे पीठ गुलाबी रंग येईपर्यंत भाजून बाजूला ठेवावे. तूप गरम करून रवा गुलाबी रंगावर भाजून घ्यावा. एका जाड बुडाच्या भांड्यात १ कप पाणी घेऊन त्यामध्ये गूळ विरघळवून, मग गाळून घ्यावा. एका पॅनमध्ये तेल गरम करावे. हुंडा बेक करण्यासाठी जाड बुडाचे भांडे गरम करायला ठेवावे.
त्यामध्ये एक चाकी ठेवावी. नंतर एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, तीळ, खसखस, वेलची पूड, हळद, बेकिंग पावडर घालून मिक्स करावे. त्यामध्ये हळूहळू गुळाचे पाणी घालावे. मग तेल घालून मिक्स करावे. केकच्या भांड्याला तेल लावावे. त्यामध्ये मिश्रण ओतून बेक करायला ठेवावे. साधारणपणे ४० ते ४५ मिनिटे बेक करावे. मग बाहेर काढून एका प्लेटमध्ये काढून वरून खोबरे व तीळ घालून काप करावेत.
वाढप: ४ व्यक्तींसाठी
साहित्य:
एक कप बासमती तांदूळ, पाव कप तूप, पाऊण कप गूळ, १ टीस्पून वेलची पूड, १ टीस्पून सुंठ पूड, मीठ, पाऊण कप ओल खोबरे (किसून), ड्रायफ्रूट सजावटीकरिता.
कृती:
तांदूळ धुऊन रात्रभर कापडावर वाळत ठेवावेत. मग सकाळी मिक्सरमध्ये रवाळ दळून घ्यावेत. एका कढईमध्ये तूप गरम करून तांदळाचे पीठ छान गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. त्यामध्ये ओले खोबरे घालून तेही थोडे भाजून घ्यावे. दुसऱ्या एका भांड्यात ३ कप पाणी गरम करून त्यामध्ये गूळ विरघळवून घ्यावा. त्यामध्ये वेलची पूड, सुंठ पूड घालून मिक्स करावे. आता हे गरम गरम मिश्रण भाजलेल्या तांदळाच्या पिठात घालावे व थोडे घट्ट होईपर्यंत गरम करावे. मिश्रण घट्ट झाले की तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून एकसारखे थापावे. वरून खोबरे व ड्रायफ्रूट घालावे. वड्या कापून सर्व्ह करावे.
वाढप: ४ व्यक्तींसाठी
साहित्य:
आवरणासाठी: दोन वाट्या गव्हाचे पीठ, २ टेबलस्पून मैदा, २ टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार.
पुरणाच्या सारणासाठी: दोन कप हरभरा डाळ, १ कप गूळ, अर्धा कप साखर, १ टीस्पून वेलची पूड, पाव टीस्पून जायफळ पूड, मीठ चवीनुसार.
कृती:
हरभरा डाळ धुऊन त्यात ४ कप पाणी घालावे व ४-५ शिट्या करून कुकरमध्ये शिजवावी. पाच मिनिटे मंद विस्तवावर डाळ शिजू द्यावी. (डाळ अगदी मऊ शिजली पाहिजे) कुकर थंड झाल्यावर डाळ चाळणीमध्ये काढावी म्हणजे जास्तीचे पाणी काढता येईल व त्या पाण्याची कटाची आमटी करता येईल. शिजलेली डाळ परत कुकरमध्ये घालावी, त्यात गूळ व साखर घालावी. मंद विस्तवावर डाळ घोटत राहावी.
पुरण इतके घट्ट झाले पाहिजे, की पुरणामध्ये झारा उभा राहिला पाहिजे. त्यामध्ये वेलची पूड, जायफळ पूड, मीठ घालून मिक्स करावे. पुरण यंत्रातून वाटून घ्यावे. डाळ शिजत ठेवल्यावर परातीत गव्हाचे पीठ, मैदा, मीठ घालून चाळून घ्यावे. मग त्यामध्ये गरम तेल व पाणी घालून कणीक सैलसर मळावी. एक ते दीड तास बाजूला ठेवावे. मग त्याचे गोळे करून पुरीच्या आकारात लाटून घ्यावे.
१ टेबलस्पून पुरण पुरीवर पसरून पुरीची वळकटी करावी व त्याला गोल आकार द्यावा. असे सर्व दिंड करावेत. एका जाड बुडाच्या पातेल्यात अर्धे पातेले पाणी घेऊन पातेले विस्तवावर ठेवावे. त्यावर चाळणी ठेवून चाळणीवर केळ्याचे पान ठेवावे. पानावर पुरणाचे दिंड ठेवावेत. चाळणीवर घट्ट झाकण ठेवून १२-१५ मिनिटे दिंड उकडून घ्यावेत.
(टीप : कणकेमध्ये गरम मोहन नक्की घालावे, म्हणजे दिंड उकडल्यावर चिवट होणार नाहीत. पुरण शिजत असताना त्यात अर्धा कप ओला खोवलेला नारळ घातला, तर पुरण अजून छान लागते. कणकेऐवजी तांदळाच्या पिठीचेही दिंड करता येतात.)
वाढप: ४ व्यक्तींसाठी
साहित्य: एक कप ज्वारी किंवा बाजरी (थोडी भाजून जाडसर दळावी), २ टेबलस्पून गहू, अर्धा कप गूळ (चिरून), १ चमचा तूप, २ टेबलस्पून सुक्या खोबऱ्याचे पातळ काप, मीठ चवीनुसार.
कृती:
प्रथम ज्वारी किंवा बाजरी थोडी खमंग भाजून घ्यावी. गहू पॅनमध्ये थोडेसे भाजून घ्यावेत. मग जाडसर दळून घ्यावेत. गूळ चिरून पाण्यामध्ये विरघळवून घ्यावा. एका जाड बुडाच्या भांड्यात गुळाचे पाणी गरम करावे. त्यामध्ये मीठ व तूप घालून उकळी आणावी. मग पीठ मिक्स करावे. मिश्रण खूप कोरडे वाटले तर थोडे अजून कोमट पाणी घालावे व झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. या मिश्रणाचे दिवे करावेत. मोदक पात्रामध्ये पाणी गरम करून चाळणीवर केळीचे पान ठेवून त्यावर दिवे ठेवावेत व १० मिनिटे वाफवून घ्यावेत.
वाढप: ४ व्यक्तींसाठी
खीर साहित्य: पाव कप तांदूळ, १ टेबलस्पून तूप, १ कप दूध, ३ टेबलस्पून साखर, २ टेबलस्पून ओले खोबरे (खोवून), १ टीस्पून वेलची पूड, ड्रायफ्रूट.
कृती:
प्रथम तांदूळ धुऊन एक कप पाण्यात ३० मिनिटे भिजत ठेवावे. मिक्सरच्या भांड्यात तांदूळ पाण्यासकट ग्राइंड करून घ्यावेत. कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये वाटलेले तांदूळ घालून उकळी आणवी. उकळी आली, की १ कप दूध व अर्धा कप पाणी घालून मिक्स करून घ्यावे. साखर व वेलची पूड घालावी. साखर विरघळली की त्यामध्ये ओला नारळ, ड्रायफ्रूट घालून एक उकळी आणावी. खीर तयार झाली.
साहित्य : एक कप गव्हाचे पीठ, १ टेबलस्पून गूळ, २ टीस्पून तूप, मीठ चवीनुसार.
कृती:
एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, गूळ, तूप घालून पीठ मळून घ्यावे. आपण चपातीसाठी मळतो तसे पण थोडेसे सैल मळावे. २० मिनिटे झाकून बाजूला ठेवावे. नंतर मळलेल्या पिठाचे एकसारखे ६ गोळे करावेत. एक गोळा घेऊन त्याची पातळ चपाती लाटावी. चपाती लाटून झाल्यावर त्यावर १ टीस्पून तूप लावावे.
आता चपाती मुडपून घ्यावी. परत एका बाजूने मुडपलेल्या चपातीवर अर्धा टीस्पून तूप लावावे. परत चपाती मुडपून त्याला त्रिकोणी आकार द्यावा. आपण जसे घडीची चपाती करतो तसे. अशा प्रकारे सर्व चपात्या लाटून मुडपून घ्याव्यात. एका चाळणीला थोडेसे तूप लावून त्यावर सर्व कानुले ठेवावेत. भांड्यात पाणी चांगले गरम करून त्यावर चाळणी ठेवून त्यावर झाकण ठेवावे. २५ ते ३० मिनिटे त्याला स्टीम द्यावी. मग गरम गरम कानुले खिरीबरोबर सर्व्ह करावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.