डॉ. सदानंद मोरे
औद्योगिक क्रांतीपासून माणसाच्या इतिहासातील निसर्गयुग संपुष्टात येऊन मानवयुगाची सुरुवात झाली.
मानवाच्या इतिहासाच्या अभ्यासकाला मानवाच्या भवितव्यासंबंधी काही एक अंदाज करण्याचा मोह झाला नाही तरच आश्चर्य. अर्थात इतिहासलेखन हे बऱ्याच वेळा विशिष्ट देशाला किंवा राष्ट्राला अभ्यासाचा विषय किंवा ‘युनिट’ मानून केले जाते.