स्वप्ना साने
ॲडव्हेंचर कॅम्प असो अथवा फॅमिली ट्रिप, ट्रेक असो किंवा हनिमून; कुठेही अगदी सहज जरी फिरायला जाणार असाल, तरी एक छोटी ब्यूटी किट सोबत असावी. हल्ली टू इन वन, थ्री इन वन असे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. म्हणजे कमीतकमी सामान घ्यावे लागेल.
फिरायला जाताय? सगळी तयारी झालीच असेल... डॉक्युमेंट्स, कपडे, फुटवेअर, ज्वेलरी, फर्स्टएड किट आणि ब्यूटी किट! हो, ब्यूटी किटही महत्त्वाची आहे. फार नाहीत, पण बेसिक गोष्टी त्यात असाव्यात, ज्या सहज कोणालाही वापरता येतील. किंवा तुमचे रोजचे स्किन केअर रुटीन फॉलो करता येईल एवढेच प्रॉडक्ट सोबत ठेवावेत.